Join us

उमटे धरणातून शुद्ध पाणीपुरवठा

By admin | Updated: March 25, 2015 22:56 IST

तालुक्यातील ६२ गावे आणि वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या उमटे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे साडेसहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

आविष्कार देसाई ल्ल अलिबागतालुक्यातील ६२ गावे आणि वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या उमटे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे साडेसहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता ४२ गावांतील ५३ हजार ६२४ लोकसंख्येला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी दिली.उमटे धरणाच्या दुरवस्थेबाबत ग्रामस्थ तसेच पत्रकारांनी टोकरे यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर टोकरे यांनी तातडीने अधिकाऱ्यांसह उमटे धरणाची पाहणी केली. उमटे धरण १९७८-७९ या कालावधीत बांधण्यात आले होेते. या धरणाच्या माध्यमातून ६२ गावे, वाड्यांसह अलिबाग शहराला पाणीपुरवठा केला जायचा, त्यातून अलिबाग शहर वगळण्यात आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून देखभाल दुरुस्तीसाठी रायगड जिल्हा परिषदेकडे १ सप्टेंबर २००९ रोजी हे धरण हस्तांतरित करण्यात आले. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे गुरुत्वीय बलावर धरणातून पाणीपुरवठा केला जातो.धरणाची सध्या दुरवस्था झाली आहे. धरणात जलशुद्धीकरण केंद्र अस्तित्वात नसल्याने धरणातील पाणी शुद्ध न करताच ते थेट पिण्यासाठी पुरविले जाते. धरणाच्या भोवताली मोठ्या संख्येने झाडे वाढली आहेत. येथील सांडव्याचीही दुरवस्था झाली आहे. धरण अस्तित्वात आल्यापासून तेथील गाळ एकदाही काढण्यात आलेला नाही. या तक्रारींची दखल घेत टोकरे यांनी अधिकाऱ्यांसह उमटे धरणाची पाहणी केली आणि जलशुद्धीकरणाचा निर्णय घेतला. १सुधारित उमटे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी सहा कोटी ५१ लाख ८० हजार १९२ रुपये २०१४-१५ साठी मंजूर करण्यात आले आहेत. ४.५ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्या माध्यमातून दररोज २.४५ एमएलडी पाणी शुद्ध केले जाणार आहे. नव्याने १४ लाख लिटरची पाण्याची टाकी तेथे बांधण्यात येणार आहे.२४२ गावांतील ५३ हजार ६२५ लोकसंख्येला शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळणार आहे. येथील सध्याची लोकसंख्या ४७ हजार आहे. ३० किमीची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. धरणाच्या मजबुतीकरणासाठी दगडी पिचिंग आणि सांडव्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे.३धरण बांधल्यापासून त्यातील गाळ काढला नाही ही वस्तुस्थिती आहे. एक वर्षापूर्वी नाशिक येथील एसडीओ विभागाने धरणाची पाहणी केली होती. त्यांच्याकडून योग्य त्या सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. याबाबत लवकरच पत्रव्यवहार करण्यात येऊन गाळा काढण्याच्या कामाला सुरुवात होईल, असे कार्यकारी अभियंता ए. ए. टोरो यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.