Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील महिला डॉक्टरचा मुंबईत डेंग्यूमुळे मृत्यू

By admin | Updated: October 27, 2014 23:58 IST

केईएम रुग्णालयातील निवासी महिला डॉक्टरचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. मुंबईतील डेंग्यूचा हा सहावा बळी आहे.

मुंबई : केईएम रुग्णालयातील निवासी महिला डॉक्टरचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. मुंबईतील डेंग्यूचा हा सहावा बळी आहे. गेल्या आठवडय़ांत रुग्णालयातील चार निवासी डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली होती, तर काही कर्मचा:यांना आणि रुग्णांनाही डेंग्यू झालेला आहे.  
डॉ. श्रुती खोब्रागडे ही अनेस्थेशिया विभागात तिस:या वर्षाला शिकत होती. मूळची पुण्याची असलेल्या श्रुतीला ताप आल्याने 
2क् ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्लेटलेट्स 2क् हजारार्पयत खाली गेल्या होत्या. उपचारादरम्यान तिच्या प्लेटलेट्स 5क्  हजारांवर आल्यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे डॉक्टरांना वाटले. मात्र, डॉ. श्रुतीची प्रकृती पुन्हा खालावल्याने 23 ऑक्टोबर रोजी तिला हिंदुजा रुग्णालयात हलवण्यात आले, अशी माहिती सूत्रंकडून मिळाली. हिंदुजा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असताना रविवारी सायंकाळी श्रुतीचा मृत्यू झाला.(प्रतिनिधी)
 
धूर फवारणी नाही
4केईएम रुग्णालयात विविध ठिकाणी पाणी साचलेले आहे, त्यातच बांधकामाचे काम 
सुरू आहे.
4यंदा केईएम रुग्णालयामध्ये धूर फवारणी झालेली नाही. परिणामी वॉर्डमध्ये असलेल्या रुग्णांनाही डेंग्यूची लागण झाली आहे. मात्र यांच्यापैकी कोणाचीही प्रकृती खालावलेली नाही.