Join us

पुंडलिक पालवे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:06 IST

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘दशक्रिया’, ‘बंदिशाळा’ अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांत भूमिका साकारणारे हौशी कलावंत पुंडलिक पालवे यांचे रविवारी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘दशक्रिया’, ‘बंदिशाळा’ अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांत भूमिका साकारणारे हौशी कलावंत पुंडलिक पालवे यांचे रविवारी नाशिक येथे कोरोनाने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. गेले १३ दिवस नाशिकमधील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व नातवंडे असा परिवार आहे.

ख्यातनाम लेखक संजय कृष्णाजी पाटील यांच्या ‘दशक्रिया’, ‘बंदिशाळा’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी छोट्या छोट्या भूमिका साकारल्या होत्या. ‘बंदिशाळा’ या चित्रपटात पडद्यामागे राहूनही त्यांनी काम केले होते. विशेष म्हणजे, गेली ३० वर्षे प्रशासकीय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून मित्रत्वाच्या नात्याने ते संजय कृष्णाजी पाटील यांच्याकडे साहाय्यक लेखक म्हणूनही कार्यरत होते.

-----------------------------------------------------------------------------------------------