Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुजारी गँगच्या हिटलिस्टवर विधवा?

By admin | Updated: September 16, 2014 02:55 IST

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी गँगच्या हिटलिस्टमध्ये मुंबईतील एका पत्रकारासह जुहू येथील चाळीतील विधवा महिलाही होती, अशी माहिती मिळाल्याने पोलीस गोंधळले आहेत.

डिप्पी वांकाणी - मुंबई 
अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी गँगच्या हिटलिस्टमध्ये मुंबईतील एका पत्रकारासह जुहू येथील चाळीतील विधवा महिलाही होती, अशी 
माहिती मिळाल्याने पोलीस गोंधळले आहेत. 
आपल्या वृत्तात पुजारीचा उल्लेख ‘चिंधी चोर’ असा केल्याने मुंबईतील एका पत्रकाराला ठार मारण्याची सुपारी पुजारी गँगकडून घेतल्याच्या आरोपावरून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 5 सप्टेंबरला तिघांना अटक केली. मदनचंद गोविंदराम सोनकर उर्फ फ्रान्सिस (27), आशुतोष नरेंद्रकुमार वर्मा (22) आणि रामबहादूर रामचंद्र चौहान (27) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 7.65 कॅलिबरचे 1 रिव्हॉल्व्हर, 5 जिवंत काडतुसे आणि 11 बोगस सिम कार्ड्स हस्तगत करण्यात आली. 
गेल्या तीन महिन्यांपासून हे तिघे नालासोपारा येथे एकत्र राहत होते व त्यांनी एक जुनी  मोटारही घेतली होती. 
पोलीस सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या या तिघांपैकी एकाने जबानीत सांगितले की, त्यांना पत्रकाराखेरीज त्या विधवेवर गोळीबार करण्याचीही सुपारी मिळाली होती. मात्र दुस:याने त्या विधवेला नव्हे, तर तिच्या पतीला ठार मारण्याची सुपारी मिळाली होती, असे सांगितले. अधिक तपासातून असे दिसून आले की त्या महिलेचा पती काही वर्षापूर्वीच मरण पावला असून, जुहू येथील एका चाळीत ती आपल्या दोन मुलींसह राहते. त्यामुळे या विधवा महिलेशी पुजारी गँगचे ठार मारण्याएवढे शत्रुत्व का असावे, या  आणि अशाच प्रश्नांनी पोलिसांना सतावले आहे. त्यांचे उत्तर शोधण्याचा सध्या पोलीस प्रयत्न करीत आहेत. 
 
अटक केलेल्या तिघांपैकी दोघांवर यापूर्वी किमान दोन आरोपपत्र दाखल झालेली असल्याने पोलिसांनी सोमवारी या प्रकरणी मोका कायदा लावण्याचा निर्णय घेतला.