Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बाबासाहेबांचे अप्रकाशित लिखाण प्रकाशित करणार’

By admin | Updated: April 8, 2015 03:34 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित लिखाण पुस्तकरूपात प्रसिद्ध करणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित लिखाण पुस्तकरूपात प्रसिद्ध करणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.बडोले म्हणाले की, पुढील वर्षी बाबासाहेबांची १२५ जयंती आहे. त्यानिमित्ताने बाबासाहेबांच्या लिखाणाचा खजिना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा शासनाचा मानस आहे. आतापर्यंत बाबासाहेबांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मात्र बरेचसे लिखाण हे प्रसिद्धीअभावी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकलेले नाही.त्यामुळे त्यांनी लिहिलेली पुस्तके आणि केलेले लिखाण इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाकडून विविध कार्यक्रमांची आखणी सुरू आहे. (प्रतिनिधी)