अजित मांडके ल्ल ठाणो
लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे आता विधानसभेतही सर्वपक्षीय उमेदवारांनी याच सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. फेसबुक, टि¦टर, गुगल, व्हॉटस्अॅप यासारख्या सोशल मीडियावर सर्वपक्षीय उमेदवार सक्रिय झाले असून शिवसेनेचे एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक आणि लाइक्स मिळाल्या आहेत. अधिकाधिक तरुणांनी त्यांचे प्रोफाइल जाणून घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला आहे. त्यामुळे आता इतर पक्षांचे उमेदवारदेखील फेसबुक आणि टि¦टरवर सक्रिय होताना दिसत असून फेसबुक आणि इतर माध्यमांवर संदेश आणि चित्रफीत टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच आता फेसबुक आणि टि¦टरवर सर्वपक्षीयांचे सोशल मीडिया युद्ध रंगल्याचे चित्र तयार झाले आहे.
ठाणो शहरातील चारपैकी तीन मतदारसंघांत यंदा चुरशीच्या लढती होणार आहेत. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाची लढत ही एकतर्फी होण्याची चिन्हे आहेत. लोकसभेत सोशल मीडियाने महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळे आता याच माध्यमाचा अधिक वापर करून मतदारांना आकर्षित करण्याचे काम उमेदवारांकडून सुरू आहे. यासाठी जवळजवळ सर्व पक्षांनी आपल्या प्रचार कार्यालयांमध्ये पाच ते दहा जणांची टीमच तयार करून एक सोशल मीडियाचा सेल तयार केला आहे. या सेलच्या माध्यमातून उमेदवाराचा रोजचा प्रचार, नवीन पक्ष प्रवेश, उमेदवाराने मतदारसंघात केलेली कामे, त्याला मिळणारा विविध संस्था व पदाधिका:यांचा पाठिंबा, रॅली, मेळावे, भाषणो, आश्वासने, त्यांचा अजेंडा हा रोजच्या रोज अपडेट केला जात आहे. तसेच उमेदवारांविषयी मतदारांना काय वाटते, यासंदर्भात मत नोंदवण्याचे आवाहनदेखील फेसबुकवर करण्यात येत आहे.
शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या फेसबुकवरील प्रोफाइलला आतार्पयत सर्वाधिक 2 लाख 876 लाइक मिळाल्या आहेत. शिवसेनेचे रवींद्र फाटक यापूर्वी आपले फेसबुक अकाउंट अपडेट करत नसले तरी आता तेदेखील यात सक्रिय झाले असून त्यांना आतार्पयत 1 लाख 3क् हजार लाइक मिळाल्या आहेत. त्यानंतर, प्रताप सरनाईक यांच्या प्रोफाइलला 55 हजार 487 लाइक मिळाल्या आहेत. परंतु, आता थोडय़ा उशिराने का होईना या उमेदवारांच्या पावलावर पाऊल ठेवून इतर उमेदवारही या माध्यमांचा आधार घेत सक्रिय झाल्याचे चित्र आहे. काही उमेदवारांचे दोन किंवा तीन प्रोफाइल असल्यामुळे खरे प्रोफाइल कोणते, याबाबत तरुणाईत मात्र साशंकता आहे.
आजकाल कृत्रीम लाईक्स मॅनेज करणा:या वेबसाईस्ट निघाल्या आहेत त्यामुळे ख:या वाटाव्या अशा लाईक्स या साईट निर्माण करतात. परिणामी ख:या लाईक्स कुठल्या आणि कृत्रीमरित्या तयार केलेल्या लाईक्स कुठल्या हे कळत नाही. असाही प्रकार घडतो आहे.
व्हॉटस्अॅपचा वापर सगळ्य़ात जास्त होतो आहे. कार्यकर्ते आणि प्रचारप्रमुख यांच्यातील संपर्कासाठी त्यांचा वाढत्याप्रमाणावर वापर सुरू आहे. फोटो आणि प्रचारवृत्त याच्या प्रसारासाठी व्हॉटस्अॅपचा वापर सुरू आहे. त्यामध्ये तरुणाईदेखील हिरीरिने सहभागी होते आहे.
याच माध्यमातून उमेदवाराचे फेसबुक, टि¦टर, गुगल अकाउंट प्रत्येक तासाला अपडेट होत आहे. तसेच उमेदवार प्रोफाइल अधिक आकर्षक बनविण्यासाठी ही यंत्रणा अधिक तत्परतेने काम करताना दिसत आहे. त्यामुळे तरुणांनीसुद्धा उमेदवारांच्या प्रोफाइलची चाचपणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे यातील बहुतेक उमेदवारांचे प्रोफाइल निवडणूक लागण्यापूर्वी आणि जोर्पयत उमेदवारी निश्चित होत नाही, तोर्पयत अपडेट केले नव्हते. परंतु, आता प्रत्येक उमेदवाराचे प्रोफाइल आणि अकाउंट तासातासाला अपडेट होत आहे. त्यामुळे फेसबुकवर टाकण्यात येणा:या पक्षांच्या जाहिरातींवरदेखील मोठय़ा संख्येने तरु ण आपल्या प्रतिक्रि या नोंदवत आहेत.