Join us  

'बेस्ट ऑफ आशा भोसले' पुस्तकाचे अमित शाह यांच्या हस्ते प्रकाशन

By संजय घावरे | Published: March 06, 2024 7:37 PM

अमित शाह यांच्या हस्ते आणि आशा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथी गृहावर 'बेस्ट ऑफ आशा भोसले' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

मुंबई: ज्येष्ठ पार्श्वगायिका महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या जीवनप्रवासातील अविस्मरणीय फोटोंवर आधारलेले 'बेस्ट ऑफ आशा भोसले' हे फोटो बायोग्राफी पुस्तक प्रकाशित झाले आहे. सह्याद्री अतिथी गृहावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

मुंबई दौऱ्यावर असलेल्या अमित शाह यांच्या हस्ते आणि आशा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथी गृहावर 'बेस्ट ऑफ आशा भोसले' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी मुंबई भाजप अध्यक्ष ॲड. आशिष शेलार, त्यांची पत्नी ॲड. प्रतिमा शेलार यांच्यासह जनाई भोसले, आनंद भोसले, व्हॅल्युएबल ग्रुपचे अमेय हेटे, अंकित हेटे, जीवनगाणीचे प्रसाद महाडकर आणि पुस्तकाच्या डिझायनर नूतन आजगावकर आदी मंडळी उपस्थितीत होती. दिवंगत छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी आशा भासले यांनी टिपलेल्या छायाचित्रांचा यात समावेश आहे. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि व्हॅल्युएबल ग्रुपच्या सहयोगाने 'बेस्ट ऑफ आशा' हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. आशा भोसले यांच्या विविध भावमुद्रा, त्यांचे जीवन आणि गाणे वेगवेगळ्या छायाचित्रांतून या पुस्तकात उलगडण्यात आले आहे. यात विविध क्षणांच्या आठवणी सांगणारी ४२ छायाचित्रे अत्यंत देखण्या मांडणीच्या आधारे सादर करण्यात आली आहेत.

टॅग्स :मुंबईआशा भोसलेअमित शाह