Join us
Daily Top 2Weekly Top 5

आत्मचरित्रच्या प्रकाशनाला तारांगण अवतरले

By admin | Updated: June 11, 2014 02:14 IST

अभिनेता दिलीप कुमार यांच्या ‘द श्ॉडो अॅण्ड सबस्टन्स’ या आत्मचरित्रचे प्रकाशन मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये अमिताभ-धर्मेद्र आणि आमीर खानच्या हस्ते झाले.

पूजा सामंत - मुंबई
गेली किमान सात दशके प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणा:या भूमिका करत तसेच पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवलेले अभिनेता दिलीप कुमार यांच्या ‘द श्ॉडो अॅण्ड सबस्टन्स’ या आत्मचरित्रचे प्रकाशन मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये अमिताभ-धर्मेद्र आणि आमीर खानच्या हस्ते झाले.
दोन तासांपेक्षा अधिक वेळ चाललेल्या कार्यक्रमाच्या संचालनाची सूत्रे करण जोहरकडे होती. दिलीप कुमार सिनेसृष्टीतील अतिशय आदरणीय अभिनेता, ज्यांच्यावर पुस्तक लिहिणो हे माङो स्वप्न होते, ज्याची आज पूर्तता झालीये, अशा मोजक्या शब्दांत पुस्तकाच्या लेखिका उदय तारा नायर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  मंचावर दीपप्रज्वलन अभिनेत्री वैजयंती माला, माधुरी दीक्षित व प्रियांका चोप्रा यांच्या हस्ते झाले. त्यानंतर कलाकारांनी भावना व्यक्त केल्या. वैजयंती माला यांनी देवदासच्या वेळची आठवण सांगत त्यांच्याकडून खूप शिकायला मिळाल्याचे नमूद केले. तर माधुरीने त्यांच्याबरोबर ‘इज्जतदार’ सिनेमा करताना, आरंभी संवादांचे विस्मरण होत असे, कारण दिलीप कुमारांच्या अभिनयाचा प्रभाव होता. तर प्रियांकाने  दिलीप कुमार यांच्या काळात आपला जन्म न झाल्याची खंत व्यक्त केली.  
या वेळी आमीर खानने दिलीप कुमारवर प्रसून जोशी यांनी लिहिलेल्या एका कवितेचे वाचन केले. महानायक अमिताभ बच्चन यांनी एक आठवण सांगितली, माङयासारख्या नायकांना आजही दिलीप कुमार यांच्या अभिनयाचे अनुकरण करावेसे वाटते, यातच त्यांचे मोठेपण सामावले आहे. काही वर्षापूर्वी सलीम जावेद आणि मी शूटिंगनंतर गप्पा मारताना दिलीप कुमार यांच्या अभिनयाचा विषय निघाला. आम्ही दोघांनी रात्री त्यांना भेटण्याची टूम  काढली. मनात संकोच असताना गेलो आणि मध्यरात्री हा अभिनयसम्राट आमच्या गप्पांत सामील झाला. हे व्यक्तिमत्त्व किती गोड, आहे याचा अनुभव घेतला, अशी आठवण अमिताभ यांनी सांगितली. 
 
च्या कार्यक्रमाला अवघे तारांगण एकवटले होते. जुन्या जमान्यातल्या धर्मेंद्र, झीनत अमान, वैजयंती माला, रणधीर कपूर, डॅनी डेन्झोप्पा अशा कलावंतांबरोबरच आजचे आघाडीचे रितेश देशमुख, सूरज बडजात्या, माधुरी दीक्षित-नेने, प्रियांका चोप्रा, अयान मुखर्जी अशा अनेक मान्यवरांनी पुस्तक प्रकाशनास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. 
च्आमीर खानने दिलीप कुमारवर प्रसून जोशी यांनी लिहिलेल्या कवितेचे वाचन केले. महानायक अमिताभ बच्चन यांनी एक आठवण सांगितली, माङयासारख्या अनेक नायकांना आजही दिलीप कुमार यांच्या अभिनयाचे अनुकरण करावेसे वाटते, यातच त्यांचे मोठेपण आहे.