Join us  

भांडुपमध्ये सार्वजनिक शौचालय खचलं, दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 10:05 AM

भांडुपच्या पाटीलवाडी भागात सार्वजनिक शौचालय खचल्याची माहिती मिळते आहे

मुंबई- भांडुप पश्चिमेतील साईसदन चाळीत असणाऱ्या सार्वजनिक शौचालयातील काही भाग शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याती भीती व्यक्त केली जाते आहे. 

फायर ब्रिगेडचे अधिकारी एनडीआरएफ जवानांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचविण्याचं काम करत आहे. सकाळी शौचालयाचा भाग खचल्यावर आतमध्ये असणारे दोन जण टाकीमध्ये अडकले. त्यापैकी एकाचा मृतदेह दिसत असून त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत,अशी माहिती भागातील शिवसेना नगरसेवक रमेश कोरेगावकर यांनी दिली आहे. 

दोन जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती स्थानिकांनी दिली होती. त्यानंतर एनडीआरएफला मदतीसाठी बोलावण्याच आल्याचं बीएससी आपत्तीनिवारण कक्षाच्या अधिकाऱ्याने सांगितलं.