Join us

डेंग्यूवर उपाय जनजागृतीचा

By admin | Updated: October 31, 2014 01:48 IST

पावसाळा संपल्यानंतरही साथीच्या आजारांपैकी डेंग्यूने मुंबईत तळ ठोकला आह़े चांगल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याने उच्चभ्रू वसाहतींना याचा सर्वाधिक त्रस आह़े

मुंबई पालिकेचे पाऊल : सहकार्य न करणा:यांवर कारवाईचे संकेत
मुंबई : पावसाळा संपल्यानंतरही साथीच्या आजारांपैकी डेंग्यूने मुंबईत तळ ठोकला आह़े चांगल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याने उच्चभ्रू वसाहतींना याचा सर्वाधिक त्रस आह़े यावर नियंत्रण आणण्यासाठी श्रीमंत लोकवस्तीमध्ये जनजागृती हाच एक मार्ग उरला आह़े यामध्ये जनजागृती व तपासणीसाठी सहकार्य न करणा:या खासगी सोसायटय़ांवर सक्ती अथवा कारवाईचे संकेत मुंबई महापालिकेने दिले आहेत.
डेंग्यू धोकादायक का?
डेंग्यूची लागण होण्यास एडिस इजिप्तो डास कारणीभूत असतो़ या आजाराचे निदान होण्यापूर्वीच रुग्णाच्या रक्तपेशी कमी होऊन जिवावर बेतत़े डेंग्यूचे चार प्रकार असून मुंबईत दुसरा आणि तिसरा प्रकार आढळून येतो़ यामध्ये अंतर्गत रक्तस्राव होऊन सर्व अवयव निकामी होत रुग्ण दगावतो़ अलीकडे डेंग्यूबरोबरच मलेरिया, मलेरिया आणि लेप्टो, डेंग्यू आणि लेप्टो असे दोन्ही आजार एकाच वेळी झाल्याचे रुग्णही आढळून येऊ लागले आहेत़ मात्र या आजारावर थेट उपचार नाहीत़  (प्रतिनिधी)
 
डेंग्यूचा फैलाव वाढण्यास कारण काय? 
च्डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी नियमित धूरफवारणी आवश्यक आह़े यासाठी दीड हजार कामगारही तैनात करण्यात आले होत़े परंतु निवडणुकीच्या डय़ुटीत बहुतांशी कामगार गुंतल्यामुळे धूरफवारणीवर परिणाम झाला, असा आरोप सदस्यांनी केला़ 
च्फवारणीच्या कामात कुचराई करणा:या कामगारांवर निलंबनाची कारवाई झाल्याचे डॉ़ नागदा यांनी सांगितल़े 
च्आठ दिवस डिङोल नसल्यामुळेही धूरफवारणी रखडली़ 
च्सतत बदलत्या तापमानामुळे डेंग्यूचा धोका वाढला, असे त्यांनी सांगितल़े
च्शहराची लोकसंख्या अधिक असल्यामुळे आरोग्य यंत्रणा कमी पडत आह़े
 
पालिकेची जनजागृती मोहीम
उच्चभ्रू वसाहती, झोपडपट्टी अशा विभागांमध्ये पाणी साचून डासांची पैदास होत असल्याने जनजागृतीसाठी पालिकेने मोहीम हाती घेतली आह़े त्यानुसार टॅक्सी व रिक्षा व वृत्तपत्रंतून स्वच्छतेचे संदेश, रेडिओवरून माहिती देणो, होर्डिग्ज, मॉस्किटो मॅनच्या माध्यमातून जागृती सुरू आह़े 
 
आजाराचे लक्षण 
डेंग्यूच्या रुग्णांमध्ये ताप आणि सांधेदुखी व अंगदुखी ही प्रमुख लक्षणो असतात़ मात्र अलीकडे डेंग्यूच्या रुग्णांच्या रक्तपेशीत झपाटय़ाने घसरण होत असून न्युमोनिया होण्याचा धोका वाढत आह़े तसेच रुग्णाची शुद्धही हरपत असल्याने अशा रुग्णांवर उपचार करणो अवघड जात़े   
 
डेंग्यूपासून बचाव कसा शक्य आहे?
प्लास्टिकचे कप, ताडपत्री, टायर, फेंगशुई, शोभेच्या फुलदाणी आदी ठिकाणी पाणी साचून देऊ नये, खूप पाणी म्हणजेच द्रवपदार्थ घेणो़ डेंग्यूसारखी लक्षणो दिसल्यास तत्काळ डॉक्टरकडे जाऊन उपचार घेणो़
 
कोणत्या कलमाखाली नागरिकांना अशी अटक करणार, याबाबत पालिकेकडे उत्तर नाही़ मात्र दोन-तीन जणांवर अशी कारवाई झाल्यास लोकांमध्ये भीती निर्माण होऊन स्वच्छतेला नागरिक महत्त्व देतील, असे मत काही अधिकारी व्यक्त करतात़ तर काही अधिकारी ही कारवाई व्यवहार्य नसल्याचे बोलत आहेत़
 
ऋषी कपूर 
यांना पालिकेची नोटीस
अभिनेता ऋषी कपूर यांच्या निवासस्थानीच पालिकेच्या तपासणीत साथीचे आजार पसरविणा:या डासांच्या अळ्या सापडल्या आहेत़ याची दखल घेऊन पालिकेने कपूर कुटुंबीयांना नोटीस पाठविण्याचा निर्णय घेतला आह़े ऋषी कपूर यांना डेंग्यूची लागण झाल्यामुळे त्यांना बुधवारी रुग्णालयात दाखल केल़े
 
पालिकेच्या तपासणीत वांद्रे पाली हिल येथील कपूर कुटुंबीयांच्या निवासस्थानी एडिस डासांच्या अळ्या सापडल्या़ या वृत्तास वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये संचालक डॉ़ सुहासिनी नागदा यांनी दुजोरा दिला़ डासप्रतिबंधक उपाययोजना का केल्या नाहीत, याचा खुलासा कपूर कुटुंबीयांना करावा लागणार आह़े