गौड सारस्वत ब्राह्मण सभा, मुलुंड या संस्थेने मुंबई फोरम ऑफ आर्टिस्टच्या सहकार्याने पं. भीमसेन जोशी स्मृती महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात ज्येष्ठ गायक पं. राजा काळे यांना पं. भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्यासह संगीत क्षेत्रातील विविध मान्यवर कलाकारांचा या महोत्सवात सहभाग आहे.
या महोत्सवात ज्येष्ठ गायक पं. राजा काळे, गिटारवादक अभिषेक प्रभू, तबलावादक मंदार पुराणिक व विघ्नेश कामत, हार्मोनियमवादक अनंत जोशी, पखवाजवादक हनुमंत रावडे, मंजिरावादक अनिल पै आदींचा सहभाग आहे. ७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाच्या सभागृहात हा कार्यक्रम रंगणार आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या महोत्सवाचे ऑनलाईन पद्धतीने प्रक्षेपण करण्यात येणार आहे.