Join us  

‘एमयूटीपी ३-अ’ कामासाठी १ कोटी रुपयांची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 2:50 AM

मुंबई : उपनगरीय रेल्वेसेवांचा कायापालट करण्याची क्षमता असलेल्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) ३-अ साठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या महत्त्वाकांक्षी एमयूटीपी ३-अ प्रकल्पाच्या कागदपत्रांसंबंधी कामांसाठी ही तरतूद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्राथमिक कामांसाठीचा निधी विविध टप्प्यांत उपलब्ध करून देणार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उपनगरीय रेल्वेसेवांचा कायापालट करण्याची क्षमता असलेल्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) ३-अ साठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या महत्त्वाकांक्षी एमयूटीपी ३-अ प्रकल्पाच्या कागदपत्रांसंबंधी कामांसाठी ही तरतूद करण्यात आली आहे. विविध टप्प्यांमध्ये या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, एमयूटीपी ३-अ प्रकल्पाची एकूण किंमत ५४ हजार ७७७ कोटी आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने मुंबईच्या विकासासाठी आखलेल्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्प २, ३ आणि ३-अ साठी एकूण आतापर्यंत ७७८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबईसाठी एकूण ४0 हजार कोटींची तरतूद करण्यात आली. यापैकी कोट्यवधी मुंबईकरांसह अधिकार्‍यांचे एमयूटीपी ३-अ या प्रकल्पाच्या मंजुरीकडे लक्ष लागले होते. तूर्तास १ कोटी रुपयांची तरतूद करून या प्रकल्पाला हिरवा कंदील देण्यात आला आहे. या प्रकल्पात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या उन्नत मार्गाचा समावेश आहे. ५५ किमीचा असलेल्या उन्नत मार्गासाठी १२ हजार ३३१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.एमयूटीपी २ मधील ३ कामांची पूर्तता बाकी आहे. ठाणे-दिवा पाचवी आणि सहावी मार्गिका, मुंबई सेंट्रल-बोरीवली सहावी मार्गिका आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम बाकी आहे. या तिन्ही कामांसाठी नव्याने डेडलाइन निश्‍चित करण्यात आली आहे. यानुसार, ठाणे-दिवा हे काम मार्च २0१९ पर्यंत पूर्ण होईल. तर मुंबई सेंट्रल-बोरीवली हे काम २ टप्प्यांत पूर्ण होतील.

कामे मार्गीकोणताही प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रस्तावित जागा उपलब्ध असणे ही बाब महत्त्वाची भूमिका बजावते. मुंबई रेल्वे विकास महामंडळाचा एमयूटीपी ३-अ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाच्या फाइल्स तसेच अन्य प्राथमिक कामांसाठी १ कोटींची तरतूद केली आहे. यामुळे प्रकल्पांच्या १४ बाबींची कामे मार्गी लागतील, असे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आर. एस. खुराणा यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईरेल्वे प्रवासी