रत्नागिरी : येथील प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे यांची कल्याण येथे बदली झाली असून, लवकरच ते बदलीच्या ठिकाणी हजर होणार आहेत.उकर्डे यांनी चिपळूण, देवरूख आणि त्यानंतर रत्नागिरी उपविभागीय अधिकारी म्हणून यशस्वीरित्या कार्यभार सांभाळला आहे. या तीनही ठिकाणी कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, सहकाऱ्यांमध्येही त्यांच्याबद्दल आपुलकीची भावना त्यांनी निर्माण केली. बेकायदा उत्खनन, अवैध वाहतूक प्रकरणांवर त्यांनी कारवाईचा बडगा उगारल्याने संबंधितांमध्ये दरारा निर्माण झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यात चार वर्षे पूर्ण झाल्याने त्यांच्या बदलीचे वारे वाहू लागले होते. अखेर कल्याण येथे त्यांची बदली झाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या पदाचा तात्पुरता कार्यभार चिपळूणचे उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांच्याकडे देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
प्रांत प्रसाद उकर्डे यांची बदली
By admin | Updated: March 1, 2016 00:44 IST