Join us

‘नाइट लाइफ’ला विरोध वाढला

By admin | Updated: February 23, 2015 01:05 IST

शहरात मूलभूत सुविधांची बोंब असताना मूठभर व्यवसायिकांच्या फायद्यासाठी शासनाने नाइट लाइफसारखी समाज विघातक भूमिका घेऊ नये,

मुंबई : शहरात मूलभूत सुविधांची बोंब असताना मूठभर व्यवसायिकांच्या फायद्यासाठी शासनाने नाइट लाइफसारखी समाज विघातक भूमिका घेऊ नये, असा इशारा मुंबईतील सामाजिक संघटनांनी दिला आहे. प्रशासनाच्या नाइट लाइफच्या भूमिकेला विरोध करीत आरोग्य, शिक्षण, व्यसन अशा विविध विषयांवर तळागाळात काम करणाऱ्या २५हून अधिक संघटना बुधवारी आझाद मैदानात निदर्शने करणार आहेत.महिला आणि चिमुरड्यांच्या लैगिंक शोषणापासून पिण्याच्या पाण्यापर्यंत विविध समस्यांनी मुंबईकरांना ग्रासले आहे. अशा परिस्थितीत कोणत्या गोष्टींना अग्रक्रम द्यायचा याची जाणीव करून देण्यासाठी प्रशासनाविरोधात सर्व संघटना एकत्र येणार आहेत. नाइट लाइफच्या नावाखाली डान्सबार सुरू करण्यासाठीच सरकार ही भूमिका घेत असल्याचा आरोप काही संघटनांनी केला आहे. मराठी माणसांच्या रोजगारासाठी नाइट लाइफ सुरू करण्याचा दावा प्रशासनाने केला आहे. त्यावर मॉल आणि हॉटेलमध्ये किती मराठी माणसे काम करतात? याची आकडेवारी जाहीर करण्याची मागणी संघटनांनी केली आहे.या प्रकारामुळे मुलींवरील अत्याचारांच्या प्रकरणांत वाढ होण्याची भीती काही संघटनांनी व्यक्त केली आहे. रोजगारासाठी काम करणाऱ्या संघटनांनी नाइट लाइफ सुरू झाल्यानंतरही रोजगारात वाढ होणार नसल्याचा दावा केला आहे. ‘नाइट लाइफ’ संकल्पेला सर्वसामान्य नागरिक, समस्त पालकांचा विरोध असल्याचे नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी सांगितले. (प्रतिनिधी)