Join us  

एलिफंटाच्या सुरक्षिततेसाठी उभारणार संरक्षण भिंत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 3:43 AM

चार कि.मी. लांबी; ३५.१२ कोटी खर्चाच्या निविदा जेएनपीटीने केल्या प्रसिद्ध

- मधुकर ठाकूर उरण : जेएनपीटीच्या भरावामुळे जागतिक कीर्तीच्या एलिफंटा बेटाच्या किनाऱ्याची झालेली प्रचंड धूप थांबविण्यासाठी जेएनपीटीने एलिफंटा बेटाच्या सभोवार सुमारे चार कि.मी. लांबीची संरक्षक भिंत उभारणीची योजना आखली आहे. २८.५ कोटी खर्चाच्या योजनेच्या निविदा जेएनपीटीने नुकत्याच प्रसिद्ध करून त्वरेने काम करण्याचे संकेत दिले आहेत. शिवसेनेने या प्रकरणी जेएनपीटी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. जेएनपीटी सीएसआर फंडातून ही योजना अमलात येणार असल्याची माहिती जेएनपीटी अधिकाऱ्यांनी दिली.जेएनपीटी बंदराच्या उभारणीसाठी सुरुवातीपासूनच समुद्रात मोठ्या प्रमाणात दगड-मातीचा भराव केला जात आहे. समुद्रात भराव टाकण्याचे काम जेएनपीटीचे पाचवे बंदर उभारणीपर्यंत कायम सुरू राहणार आहे. मात्र. समुद्रात होणाºया भरावामुळे एलिफंटा बेटावरील समुद्रकिनाºयावरील समुद्राची पातळी वाढत आहे. त्यामुळे किनाºयावरील बांधबंदिस्ती व संरक्षक कठडे तोडून समुद्ररेषेपासून सुमारे दहा मीटर आत पाणी घुसत आहे.समुद्रातील भरावामुळे संरक्षक भिंती कोसळल्याने एलिफंटा बेटावरील किनाºयांची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहेच. याशिवाय समुद्राचे पाणी थेट मोरा आणि शेतबंदर या दोन गावात शिरू लागले आहे. समुद्राच्या भरतीचे पाणी या दोन गावात शिरू लागल्याने ही दोन गावे पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.जेएनपीटी बंदराच्या समुद्रात होणाºया भरावामुळे एलिफंटा बेटावरील समुद्रकिनाºयाची होणारी प्रचंड धूप आणि समुद्राचे पाणी गावागावांत शिरण्याचा धोका निर्माण झाल्याने शिवसेनेने एलिफंटा बेटाच्या संरक्षणासाठी सुरक्षा भिंत बांधण्याची मागणी केली होती. यासाठी जेएनपीटी प्रशासनाला सेनेने शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांंच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन सेनेचे सदस्य बळीराम ठाकूर यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता.दोन वर्षांपूर्वी कामाला मंजुरीजेएनपीटीकडून एलिफंटा बेटाच्या सागरीकिनाºयावरील धूप थांबविण्यासाठी संरक्षक भिंत उभारणीच्या कामाला दोन वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर नुकत्याच ३५.१२ कोटी खर्चाच्या कामाच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत.यामध्ये एलिफंटा बेटाच्या सागरी संरक्षक भिंती उभारणीच्या कामासाठी २८.५ कोटी तर पाणजे गावासाठी सी वॉल उभारणे आणि न्हावाच्या दिशेने नाव उतरविण्याकरिता जेट्टीची निर्मिती आदी कामांचा यात समावेश असल्याची माहिती जेएनपीटी अधिकाºयांनी दिली.