सातारा : ‘कऱ्हाड दक्षिण’मधून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच लढावे, अशी मागणी प्रदेश निरीक्षक सुरेश कुऱ्हाडे आणि जिल्हाध्यक्ष आ. आनंदराव पाटील यांनी आज, मंगळवारी मुंबई येथे काँग्रेस निवडणूक समितीकडे केली. मात्र, याचवेळी मुख्यमंत्र्यांनी वाई मतदारसंघातून लढावे. आम्ही त्यांच्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरू,’ अशा आशयाच्या ठरावाची प्रत वाई तालुका काँग्रेसने निवडणूक समितीला दिली. माजी आ. मदन भोसले यांचे नेतृत्व मानणाऱ्या तालुका कार्यकारिणीनेच ही मागणी केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबई येथे काँग्रेस भवनात इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. मुलाखतीदरम्यान, प्रत्येक जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश निरीक्षकांनीही आपली भूमिका मांडली. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत जे मतदारसंघ काँग्रेसकडे होते, त्याच मतदारसंघातील इच्छुकांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यामुळे सातारा जिल्ह्यातून फक्त / पान १३ वर विलासराव उंडाळकरांची पाठ ‘कऱ्हाड दक्षिण’चे प्रतिनिधित्व आमदार विलासराव पाटील-उंडाळकर करतात. त्यांनी काँग्रेस भवनातून उमेदवारी अर्जही नेला आहे. मात्र, मंगळवारी झालेल्या मुलाखतीदरम्यान ते अनुपस्थित राहिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता ‘काका’ आणि ‘बाबा’ गटातील राजकीय तणाव वाढला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्र्यांनी ‘कऱ्हाड दक्षिण’च्या फेऱ्या वाढविल्या आहेत. ‘वाई’ काँग्रेसची मदनदादांना दुसरी पसंती वाई विधानसभा मतदारसंघ गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडे होता. येथून तत्कालीन आमदार मदन भोसले यांनी निवडणूक लढविली. मात्र, ते राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार मकरंद पाटील यांच्याकडून पराभूत झाले. मंगळवारी झालेल्या मुलाखतीदरम्यान, मदन भोसले अनुपस्थित राहिले. मात्र, याचवेळी वाई तालुका काँग्रेस अध्यक्षांनी वाई मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांनी लढावे, अशी मागणी केली. मदन भोसले आमचे नेते असलेतरी आम्ही मुख्यमंत्र्यांसाठी आग्रही असल्याचेही यावेळी सांगण्यात आल्याची माहिती आ. आनंदराव पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांसाठी ‘कऱ्हाड दक्षिण’ किंवा ‘वाई’च्या उमेदवारीचा प्रस्ताव
By admin | Updated: August 20, 2014 00:27 IST