Join us  

मंडईमध्ये व्यवसाय करणा-या गाळेधारकांच्या शुल्कात दुप्पट वाढ प्रस्तावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 2:34 AM

मुंबई : मंडईमध्ये व्यवसाय करणा-या गाळेधारकांच्या शुल्कात दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. तब्बल १६ वर्षांनंतर ही वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे गाळेधारकांच्या शुल्कात किमान चारशे रुपयांची वाढ होणार आहे. परिणामी भाज्या आणि मासे, मटणाच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

मुंबई : मंडईमध्ये व्यवसाय करणा-या गाळेधारकांच्या शुल्कात दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. तब्बल १६ वर्षांनंतर ही वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे गाळेधारकांच्या शुल्कात किमान चारशे रुपयांची वाढ होणार आहे. परिणामी भाज्या आणि मासे, मटणाच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.महापालिकेच्या ९२ मंडई आहेत. यापैकी बहुतांशी मंडई मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा गेली काही वर्षे वादात अडकला आहे. या मंडईतील गाळेधारकांकडून वार्षिक शुल्क पालिका वसूल करीत असते. सन २००० ते २०१६ पर्यंत महापालिकेने या शुल्कात वाढ केलेली नाही, मात्र या सोळा वर्षांमध्ये महागाईचा दर वाढल्याने मंडईच्या शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव विधी समितीपुढे प्रशासनाने मांडला आहे. स्थायी समिती आणि महापालिकेच्या महासभेत या दरवाढीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर ही शुल्कवाढ लागू होणार आहे. या शुल्कात पुढे दरवर्षी दहा टक्के वाढ करण्याची शिफारस या प्रस्तावातून करण्यात आली आहे. त्यामुळे मंडईमध्ये कोणतीही वस्तू विकण्यासाठी आतापर्यंत वार्षिक दोनशे रुपये असलेल्या या दरात दुप्पट वाढ होऊन चारशे रुपये होणार आहे. गुरुवारी होणाºया विधी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे. या दरांमध्ये वाढ झाल्यास गाळेधारक हे नुकसान ग्राहकांच्या खिशाला कात्री लावून वसूल करण्याची शक्यता नाकारता येत नाही.>माशांसाठीतीन हजार मोजापालिकेच्या बºयाच मंडर्इंमध्ये मासे व मटण विक्रेतेही आहेत. या विक्रेत्यांना परवाना शुल्कापोटी वार्षिक दीड हजार रुपये भरावे लागत होते. त्यात आता वाढ करीत वार्षिक तीन हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

शुल्कवाढ खालीलप्रमाणे (आकडेवारी रुपयांमध्ये)प्रकार सध्या प्रस्तावितकोणतीही वस्तू २०० ४००रिकाम्या टोपल्या हटवणे १५०० ३०००गोठवलेले मांस आणि मासे १५०० ३०००ताजे मांस आणि मासे १५०० ३०००मांसविक्रीचे दुकान १५०० ३०००कोंबड्यांचे दुकान १५०० ३०००कोंबड्या ठेवणे १५०० ३०००

टॅग्स :भाज्या