बोर्ली-मांडला : रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिघी पोर्टमधील अनेक मालमत्ता महसूल विभागाने सीलबंद केल्या असून दिघी पोर्ट प्रशासनाने ४२ कोटी २९ लाख ७० हजारांचा महसूल थकविला आहे. या कारवाईप्रसंगी मोठ्या प्रमाणात वाळूची साठेबाजी केल्याने त्याबाबत देखील कारवाई करण्यात आली आहे. श्रीवर्धनचे प्रभारी तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या पथकाने ही महसुली कारवाई केली आहे. कोट्यवधींच्या महसूल थकबाकीविरोधात या बंदरातील महत्त्वाच्या मालमत्ता सीलबंद केल्या आहेत. या कारवाईमुळे दिघी पोर्टविरोधात याचिका दाखल करणाऱ्यांना काही प्रमाणात सुखद धक्का मिळाला आहे. २००८ पासून दिघी पोर्टच्या कामाला सुरुवात झाली आहे. समुद्रात दिघी गावच्या किनारी सात जेटी बांधून जेएनपीटीसारखे पोर्ट उभारुन या भागाचा विकास करण्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे जात होते. (वार्ताहर)तब्बल ४२ कोटी २९ लाख ७० हजार दंडाची थकबाकी न दिल्याने मंगळवारी अखेर महसूल खात्याने या दिघी पोर्ट प्रकल्पामधील दोन मोबाइल हार्बर क्रेन, दोन मोटार के्रन, दोन क्रेन फोर्क, एक जनरेटर, एक पेट्रोलिंग बोट या मालमत्ता सीलबंद केल्या असून अंतर्गत असणाऱ्या चारही दरवाजांना सील ठोकण्यात आले आहे. - वीरसिंग वसावे, प्रभारी तहसीलदार, श्रीवर्धन.
दिघी पोर्टची मालमत्ता जप्त
By admin | Updated: July 14, 2015 23:15 IST