Join us
Daily Top 2Weekly Top 5

जाहिरातीच्या मेसेजची सुविधा व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच !

By admin | Updated: May 20, 2015 02:42 IST

आजवर एसएमएस (शॉर्ट मेसेज सर्व्हिस) च्या माध्यमातून कंपन्यांतर्फे होणारी जाहिरातबाजी लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवरूनही सुरू होणार आहे.

मुंबई - आजवर एसएमएस (शॉर्ट मेसेज सर्व्हिस) च्या माध्यमातून कंपन्यांतर्फे होणारी जाहिरातबाजी लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवरूनही सुरू होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप विकत घेणाऱ्या फेसबुक कंपनीने ‘बी टू सी’ (बिझनेस टू कस्टमर) या पॉलिसीवर काम करण्यास सुरुवात केली असून, लवकरच याची घोषणा करण्यात येणार आहे. जगभरातील किमान १२५ कोटी लोक सध्या व्हॉट्सअ‍ॅपचा प्रभावी वापर करीत आहेत. तसेच व्हॉट्सअ‍ॅप हे तंत्रज्ञान स्मार्ट फोनच्या आधारेच वापरले जाणे शक्य असल्याने यामुळे संभाव्य ग्राहकही जमा करणे सोपे होणार आहे.