Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्य पोलीस दलातील आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:06 IST

नवी मुंबईतील सहपोलीस आयुक्त डॉ. जय जाधव यांचाही समावेशलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य पोलीस दलात कार्यरत तीन ...

नवी मुंबईतील सहपोलीस आयुक्त डॉ. जय जाधव यांचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य पोलीस दलात कार्यरत तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना विशेष पोलीस महानिरीक्षक पदी बढती देऊन नवीन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. तर, पोलीस अधीक्षक/पोलीस उपायुक्त, समादेशक पदावरील १२ अधिकाऱ्यांना पदोन्नती देत त्याच ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे. राज्य पोलीस मुख्यालयाने शुक्रवारी हे आदेश जारी केले.

राज्य पोलीस मुख्यालयात आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजेश प्रधान आणि राज्य गुप्तवार्ता अकादमी पुणे येथील पोलीस उपमहानिरीक्षक आणि संचालक पदावर कार्यरत असलेल्या एम. बी. तांबडे यांना विशेष पोलीस महानिरीक्षक पदी बढती देत त्याच ठिकाणी नेमणूक करण्याात आली आहे. तर नवी मुंबईतील सहपोलीस आयुक्त डॉ. जय जाधव यांना बढती देऊन नवी मुंबईतील सहपोलीस आयुक्त पद उन्नत करुन त्याच ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे.

तर, पोलीस उपायुक्त परमजीत दहिया (परिमंडळ ३), राजेंद्र माने (राज्य गुप्तवार्ता विभाग), महेश पाटील (मीरा-भाईंदर, वसई विरार), डी. के. साकोरे (मंत्रालय सुरक्षा), विजय पाटील (परिमंडळ ४) यांच्यासह पोलीस अधीक्षक डी. टी. शिंदे (पालघर), पी. व्ही. उगले (ओ.सी.बी. ठाणे), संजय जाधव (महामार्ग सुरक्षा), विनायक देशमुख (जालना) यांना पदाेन्नती देण्यात आली आहे. अशाच प्रकारे राज्य राखीव पोलीस बल गट ८ चे समादेशक अखिलेश कुमार सिंह आणि बल गट १ च्या नीवा जैन यांनाही पदोन्नती देत त्यांची त्याच ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे.

.................................