Join us
Daily Top 2Weekly Top 5

महानगर टेलिफोन निगमच्या ४०० कर्मचाऱ्यांना पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महानगर टेलिफोन निगमच्या चतुर्थ श्रेणीतील कामगारांच्या पदोन्नतीचा २००९ पासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर निकाली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महानगर टेलिफोन निगमच्या चतुर्थ श्रेणीतील कामगारांच्या पदोन्नतीचा २००९ पासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर निकाली निघाला आहे.

१२ वर्षांनी त्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला.

महानगर टेलिफोन निगमच्या खात्यांतर्गत होणाऱ्या टेलिफोन मेकॅनिक या पदासाठी ४०० कर्मचाऱ्यांनी २००९ मध्ये परीक्षा दिल्या होत्या. मात्र, परीक्षा देऊनही त्यांची पदोन्नती थांबली होती. यावर, मनसेच्या जनाधिकार सेना व संचार युनियनने पाठपुरावा केला. प्रशासनापुढे कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडून अगदी दिल्लीपर्यंत पाठपुरावा करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या परीक्षा, कोर्ट केस, प्रलंबित निकाल लावणे, तसेच कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यासाठी प्रयत्न करून आर्थिक व पदोन्नतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर आम्हाला यात यश मिळाले, असे मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी सांगितले. पदोन्नतीचा व व भविष्याचा आर्थिक प्रश्न सोडविल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी जनाधिकार सेना व संचार युनियनचे आभार व्यक्त केले.