शाहिद हा प्रियंकाचा एक्स बॉयफ्रेंड. आपल्या या जुन्या बॉयफ्रेंडसोबत बॉक्स ऑफिसवर सामना होऊ नये, याची प्रियंका चोपडाने खबरदारी घेतली आहे. त्यासाठी प्रियंकाने आपला ‘मेरी कोम’ हा चित्रपट ठरलेल्या तारखेच्या आधीच प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. आधी हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी रिलीज करण्याचे ठरले होते; परंतु याच कालावधीत प्रियंकाचा एक्स बॉयफ्रेंड शाहिद कपूरचा चर्चित ‘हैदर’ हा चित्रपट रिलीज होत आहे. आपल्या एक्स बॉयफ्रेंडच्या चित्रपटासोबतच आपला चित्रपट प्रदर्शित झाला तर त्याचा फटका बसू शकतो, त्यामुळे प्रियंकाने आपल्या चित्रपटाच्या रिलीजची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
एक्स बॉयफ्रेंडशी टाळला प्रियंकाने सामना
By admin | Updated: June 3, 2014 00:57 IST