Join us

प्रियंका चोपडा तोडणार करार, सध्या कायदेशीर सल्ला-मसलत सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 02:26 IST

‘नीरव मोदी’ डिझायनर हि-यांची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर असलेली अभिनेत्री प्रियंका चोपडा आता या घोटाळ्यानंतर मोदीशी असलेले सर्व करार मोडित काढणार आहे. यासाठी ती सध्या कायदेशीर सल्ला घेत असल्याचे प्रियंकाच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई : ‘नीरव मोदी’ डिझायनर हि-यांची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर असलेली अभिनेत्री प्रियंका चोपडा आता या घोटाळ्यानंतर मोदीशी असलेले सर्व करार मोडित काढणार आहे. यासाठी ती सध्या कायदेशीर सल्ला घेत असल्याचे प्रियंकाच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले आहे.या घोटाळ्यानंतर प्रियंका चोपडा नीरव मोदीविरोधात खटला दाखल करणार असल्याचे वृत्त होते. मात्र ते वृत्त चुकीचे असून हा घोटाळा लक्षात घेता सर्व करार तोडण्याचा विचार केला जात आहे, असे प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.हा घोटाळा समोर येताच प्रियंकाने नीरव मोदीशी संबंध तोडले असले तरी मागीलवर्षी जानेवारी महिन्यात या ब्रॅण्डच्या लॉन्चिंगवेळी तिने नीरव मोदीवत स्तुतीसुमने उधळली होती, हे विशेष.दुसरीकडे, या घोटाळ्यानंतर ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर असलेला अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राही कायदेशीरखटला दाखल करण्याचा विचार करीत असल्याचे वृत्त आहे. केट विन्सेंट व डकोटा जॉन्सन या अभिनेत्रीही नीरव मोदी ब्रॅण्डशी जुळल्या आहेत.

टॅग्स :प्रियांका चोप्रा