Join us
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शाळा आणि पालकांचा वाद सुरूच

By admin | Updated: May 27, 2017 03:07 IST

दहिसरच्या युनिर्व्हसल हाय शाळेने वाढीव शुल्क न भरलेल्या ७० ते ८० विद्यार्थ्यांना पत्र पाठवल्यामुळे पुन्हा एकदा शुल्क वाढीचा विषय चर्चेत आला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहिसरच्या युनिर्व्हसल हाय शाळेने वाढीव शुल्क न भरलेल्या ७० ते ८० विद्यार्थ्यांना पत्र पाठवल्यामुळे पुन्हा एकदा शुल्क वाढीचा विषय चर्चेत आला. पण, शुल्कवाढ ही नियमांप्रमाणेच केल्याचे शाळेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या शाळेत प्रत्येक वर्षी १५ टक्के शुल्कवाढ करण्यात येते. प्रत्येक वर्षी शुल्कवाढ करण्यात येत असल्याने पालक त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा झाली होती. त्या वेळी शुल्कात वाढ करण्यात येऊ नये, असे तोंडी सांगितले होते. पण, तरी शाळेने यंदाही १५ टक्के शुल्कवाढ केली आहे. दरवर्षी हा भुर्दंड सहन करावा लागल्याने पालकांनी याचा विरोध केला होता. पण, आता या पालकांना शाळेतर्फे पत्र आले आहे. वाढीव शुल्क न भरल्यास कारवाई करण्यात येईल, असे त्यात सांगितले आहे.