Join us  

फोर्ट येथील दुर्घटनेत एका खासगी कंत्राटी कामगाराचा मृत्यू तर एक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2021 9:57 PM

Mumbai News : फ्लोरा फाऊंटेन ते चर्चगेट स्थानकपर्यंत वीर नरिमन मार्गावर १२०० मीटर व्यासाच्या जलवाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे.

मुंबई : फोर्ट येथील काळा घोडा परिसरानजीक शनिवारी दुपारी साडेतीन वाजता जलवाहिनीचे काम सुरु असताना घडलेल्या दुर्घटनेत दोन खासगी कंत्राटी कामगार जखमी झाले. त्यापैकी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पिंटू सिंग (३४) या कामगाराचा दूर्देवी मृत्यू झाला. तर सुकरकुमार सिंग या दुस-या जखमी कामगाराला घटनास्थळाहून सुरक्षितरित्या बाहेर काढत जीटी रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले. उपचार करून ब्याला सोडून देखील देण्यात आले.

फ्लोरा फाऊंटेन ते चर्चगेट स्थानकपर्यंत वीर नरिमन मार्गावर १२०० मीटर व्यासाच्या जलवाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे. शनिवारी एम/एस देव इंजिनिअर्सकडून हे काम सुरु असतानाच दुर्घटनाग्रस्त दोन कामगारांनी १२०० मीटर व्यासाच्या जलवाहिनीत प्रवेश केला. दरम्यान, के.बी.पाटील मार्ग आणि वीर नरिमन मार्ग येथील केबल इतर अडचणींमध्ये हे कामगार अडकले. घटनास्थळी असलेल्या सुपरव्हिसरने तत्काळ इतर कामगारांच्या मदतीने या दोन्ही कामगारांना सुरक्षित बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. मात्र या जखमी दोन्ही कामगारांपैकी एकाचा मृत्यू झाला.  दुसरीकडे या घटनेची माहिती मुंबई अग्निशमन दलास देखील देण्यात आली. त्यांनी देखील घटनास्थळी दाखल होत मदत केली. 

टॅग्स :मुंबई