विंग : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेश दौऱ्यात गुंतलेले आहेत़ देशाला सध्या पूर्णवेळ संरक्षण मंत्री नाही़ त्यामुळे सरहद्द संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे,’ अशी टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली़ विंग, ता़ कऱ्हाड येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते़ यावेळी आमदार आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, राजेश पाटील- वाठारकर, डॉ़ इंद्रजित माहिते, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते जयवंत जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती़ मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘कोणी कितीही गुजरात रोल मॉडेल सांगत असले तरी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था त्यापेक्षा दुप्पट मोठी आहे हे जनतेने लक्षात घेतले पाहिजे़गेल्या तीन वर्षांत तालुक्यातील विकासासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला आहे़ यापुढेही विकासासाठी मी कटिबध्द असून, प्रत्येक गावाने विकास आराखडा तयार करावा़’यावेळी आमदार आनंदराव पाटील, राजेश पाटील-वाठारकर, वसंतराव शिंदे आदींची भाषणे झाली़ अशोक यादव यांनी प्रास्ताविक केले तर अॅड़ राम होगले यांनी आभार मानले़ (वार्ताहर)मदनराव मोहितेंची विरोधकांवर टीकामदनराव मोहिते म्हणाले, ‘मुख्यमंत्री चव्हाण यांच्यावर जनाधार नसल्याचा आरोप काहीजण करीत आहेत; पण जनाधाराची भाषा करणारे निवडणुकीत कधी पराभूत झाले नव्हते का ? उच्च शिक्षित असणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर कोणीही काहीही टीका करीत आहे, ही गोष्ट चुकीची आहे़ दिवंगत यशवंतराव चव्हाण, दिवंगत यशवंतराव मोहिते अन् विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कुणालाच शिंतोडे उडवायला संधी मिळालेली नाही़ त्यांनी सत्तेच्या माध्यमातून जहागिरीही निर्माण केलेली नाही, हे टीकाकांरांनी लक्षात घ्यायला हवे आहे़’
सरहद्द संरक्षणाचा प्रश्न गंभीर- पृथ्वीराज चव्हाण : पंतप्रधानांवर केली टीका
By admin | Updated: September 25, 2014 21:42 IST