Join us
Daily Top 2Weekly Top 5

आर्थर रोड जेलमध्ये कैदी भिडले, ब्लेडने वार

By admin | Updated: June 16, 2016 14:46 IST

मुंबईच्या आर्थररोड जेलमध्ये गुरुवारी दोन कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी ब्लेडने वार करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १६ - मुंबईच्या आर्थररोड जेलमध्ये गुरुवारी दोन कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी ब्लेडने वार करण्यात आले. मोक्काखाली कैदेत असलेल्या गोपाळ शेट्टीवर (३५) सलीम फैझल खानने ब्लेडने वार केले. 
 
हाणामारीत दोन्ही कैदी जखमी झाले असून, दोघांना जे.जे.रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. 
 
आर्थर रोड जेलमध्ये कैद्यांमध्ये हाणामारीची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही वेगवेगळया गँगच्या गुंडांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या आहेत.