Join us  

आचारसंहितेआधी रेल्वे प्रवास सुखकर करणाऱ्या सेवा लागू; विविध सुविधांचे लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 12:39 AM

रेल्वेमंत्र्यांची उपस्थिती

मुंबई : रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत उपनगरी मार्गावरील सरकते जिने, पादचारी पूल, वाय-फाय, हरित स्थानके, दुसरे न्यायालय आणि मध्य रेल्वे मार्गावरील दुसºया राजधानी एक्स्प्रेस रेकचा लोकार्पण कार्यक्रम शुक्रवारी मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस फलाट क्रमांक १८ वर आयोजित करण्यात आला होता. प्रवाशांच्या कायदेविषयक समस्या सोडविण्यासाठी दुसरे न्यायालय उभे करण्यात आले असून, त्यांचे लोकार्पणही यावेळी रिमोटद्वारे करण्यात आले.

खार रोड, विलेपार्ले येथील पादचारी पूल, लोअर परळ येथील सरकता जिन्यांचे लोकार्पण करण्यात आले. हार्बर मार्गावरील चेंबूर आणि डॉकयार्ड रोड या स्थानकांना हरित स्थानक म्हणून मान्यता मिळाली आहे.

२२ रेल्वे स्थानकांवर एलइडी इंडिकेटरसीएसएमटी, मशीद, चिंचपोकळी, करी रोड, विक्रोळी, कांजुरमार्ग, भांडुप, नाहूर, मुलुंड, कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर, ठाकुर्ली, उल्हासनगर, नेरळ, कर्जत, खडवली,वाशिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी या २२ रेल्वे स्थानकावर एलइडी इंडिकेटर बसविण्यात आले. तर सीएसएमटी, चिंचपोकळी, करी रोड, जीटीबी, शीव, चुनाभट्टी, किंग्ज सर्कल, कुर्ला, विद्याविहार, लोकमान्य टिळक टर्मिनस, भांडुप, मुलुंड, ठाणे या १३ रेल्वे स्थानकांचे छत आणि फलाटांची दुरुस्ती करण्यात आली. सीएसएमटी स्थानकावर फलाट क्रमांक १४ ते १८ नवीन प्रवासी कॉरिडोर, परळ स्थानकातील सरकते जिने आणि लिफ्ट, गोवंडी, घाटकोपर स्थानकात नवीन तिकीट घर, सीएसएमटी, भायखळा स्थानकात ३ मोठे पंख्याचे लोकार्पण करण्यात आले.

रेल्वेवर सौर पॅनेल लावण्याचा प्रकल्प अयशस्वीप्रदूषण कमी करण्यासाठी आणि ऊर्जेची बचत करण्यासाठी रेल्वेवर सौर पॅनेल लावण्याचा प्रकल्प उभारला होता. मात्र, रेल्वे कारशेड, देखभाल करण्यासाठी वारंवार जाते. त्यामुळे रेल्वे सूर्यप्रकाशात किती वेळा राहिल, याचे गणित जुळले नाही, त्यामुळे रेल्वेवर सौर पॅनेल लावण्याचा प्रकल्प अयशस्वी ठरल्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.

संपूर्ण रेल्वे विद्युतीकरण करण्याचा प्रयत्नडिझेलवर चालविण्यात येणारी रेल्वेऐवजी विद्युत रेल्वे चालविणे आर्थिकदृष्ट्या उत्तम आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील रेल्वे विद्युतीकरणावर चालविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.४,५७४ स्थानकांवर वाय-फायदेशातील ४,५७४ स्थानकांवर वाय-फायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. रेल्वे स्थानकांवरील वाय-फाय सर्वाधिक जलद असल्याचे रेल्वेमंत्री गोयल यांनी सांगितले. तर लोअर परळ, प्रभादेवी, महालक्ष्मी, माटुंगा रोड, माहिम, सांताक्रुझ, विलेपार्ले, जोगेश्वरी, राम मंदिर, शहाड, दिवा, आंबिवली, टिटवाळा, भांडुप, कांजूरमार्ग, नाहूर, ठाकुर्ली, कॉटनग्रीन, गोवंडी, मानखुर्द, शिवडी, जीटीबी, डॉकयार्ड रोड, सॅण्डहर्स्ट रोड, चुनाभट्टी, किंग्ज सर्कल, मशीद, टिळकनगर, कामन रोड या २९ स्थानकांवर वाय-फाय बसविण्यात येणार आहेत.

टॅग्स :लोकल