Join us
Daily Top 2Weekly Top 5

खारमध्ये हुक्का पार्लरवर छापा

By admin | Updated: January 21, 2017 23:31 IST

स्थानिकांच्या तक्रारीची दखल घेत खारमध्ये एका हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा घातला. शुक्रवारी रात्री करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

मुंबई : स्थानिकांच्या तक्रारीची दखल घेत खारमध्ये एका हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा घातला. शुक्रवारी रात्री करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी एकाला अटक केली आहे. लॅव्हेंडर लॉज असे या हुक्का पार्लरचे नाव आहे. हे पार्लर उशिरा रात्रीपर्यंत सुरू असते. तसेच या पार्लरमध्ये तंबाखूजन्य फ्लेवर्स वापरले जातात. त्यामुळे या ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होतो, अशी तक्रार स्थानिकांकडून करण्यात आली होती. त्यानुसार खार पोलिसांनी याची दखल घेत शुक्रवारी रात्री या ठिकाणी धाड टाकली. कारवाईत पार्लरचा चालक समीर एस. याच्यासह सात जणांना ताब्यात घेण्यात आले. शिवाय हुक्कापॉटसह विविध फ्लेवर्स तसेच पार्लरमधील अन्य साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे. (प्रतिनिधी)