Join us

बॉक्स सिनेमाच्या कार्यालयावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:12 IST

टीआरपी घोटाळा प्रकरण :बॉक्स सिनेमाच्या कार्यालयावर छापाटीआरपी घोटाळा प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी ...

टीआरपी घोटाळा प्रकरण :

बॉक्स सिनेमाच्या कार्यालयावर छापा

टीआरपी घोटाळा प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मंगळवारी बॉक्स सिनेमाच्या मालाड येथील कार्यालयावर गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाने (सीआययूचे) छापा टाकला. कॉपी राईट्स प्रकरणीही पोलीस अधिक तपास करत आहे.

‘ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल’ या संस्थेला (बार्क) मदत करणाऱ्या हंसा रिसर्च ग्रुपचा माजी कर्मचारी विशाल भंडारी याच्या अटकेनंतर टीआरपी घोटाळा उघडकीस आला. भंडारीने दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने बॉक्स सिनेमा, फक्त मराठी या वाहिन्यांच्या मालकांना तसेच हंसा ग्रुपच्या माजी कर्मचाऱ्यांना अटक केली. याचप्रकरणी बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांनाही अटक करण्यात आली. आतापर्यंत एकूण १५ जणांना अटक करुन आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यात बॉक्स सिनेमा, फक्त मराठी, रिपब्लिक टिव्ही, न्यूज नेशन आणि महामुव्हीचे नाव समोर आले आहे.

याच घोटाळ्याच्या अधिक चौकशीसाठी मंगळवारी सीआययूचे प्रमुख सचिन वाझे यांनी मालाडच्या चिंचोली बंदर येथे असलेल्या बॉक्स सिनेमाच्या कार्यालयावर छापा टाकला. यात कॉपी राईट्सबाबतही पथक अधिक चौकशी करत आहे. घटनास्थळावरून महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त करण्यात आली. तसेच या घोटाळ्यातील पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे.