Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रधान सचिवांनी घेतली मुख्याध्यापकांची शाळा

By admin | Updated: August 22, 2015 22:49 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’चे ध्येय गाठण्यासाठी शालेय शिक्षण क्रीडा प्रधान सचिव नंदकुमार यांनी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांसह ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिकांच्या

ठाणे : ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’चे ध्येय गाठण्यासाठी शालेय शिक्षण क्रीडा प्रधान सचिव नंदकुमार यांनी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांसह ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिकांच्या व खाजगी शाळांच्या मुख्याध्यापकांची ठाण्यात शनिवारी कार्यशाळा घेऊन सखोल मार्गदर्शन केले. येथील एनकेटी सभागृहात या शालेय प्रधान सचिवांनी ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’च्या दृष्टीने विविध स्वरूपाचे धडे या मुख्याध्यापकांना दिले. सकाळी ११ ते दुपारी २ वाजेच्या तीन तासांच्या कालावधीतील या शाळेत गटशिक्षणाधिकाऱ्यांसह सुमारे ६५० मुख्याध्यापकांची उपस्थिती होती. या वेळी व्यासपीठावर नंद कुमार यांच्यासह जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी अशोक मिसाळ आदी उपस्थित होते. राज्यात २०१७ पर्यंत एकही विद्यार्थी अप्रगत दिसू नये, यासाठी राज्यभर युद्धपातळीवर कामकाज सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी केवळ जिल्हा परिषद, महापालिका, आश्रमशाळा आदी शाळांच्या मुख्याध्यापकांची कार्यशाळा न घेता खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांसह सर्व भाषिक शाळांना यात सहभागी करून घेण्यासाठी शालेय प्रधान सचिव स्वत: कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करीत आहेत. यानुसार, या वेळी घेतलेल्या कार्यशाळेत त्यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, फ्री मॅट्रीक स्कॉलरशिप, सरल डेटा बेस आणि विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी काढलेल्या अध्यादेशाचे सखोल मार्गदर्शन उपस्थितांना केले. या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)