Join us

विद्याथ्र्यानी ऐकले पंतप्रधानांचे भाषण

By admin | Updated: September 6, 2014 01:13 IST

गणोशोत्सवाच्या सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्याथ्र्याना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन लाभले.

नवी मुंबई : गणोशोत्सवाच्या सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्याथ्र्याना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून मोदी यांनी शुक्रवारी थेट प्रक्षेपणाद्वारे सर्व विद्याथ्र्याशी सुसंवाद साधला. त्याकरिता नवी मुंबईतही पालिकेच्या तसेच खाजगी शाळांमध्ये टीव्ही अथवा प्रोजेक्टरची सोय करण्यात आली होती.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राज्यातील सर्वच विद्याथ्र्याशी थेट संपर्क साधला. शिक्षक दिनानिमित्ताने मोदींचे होणारे भाषण सर्व शाळांमध्ये दाखवले जावे असे परिपत्रक शाळांना पाठवण्यात आले होते. त्यानुसार नवी मुंबईत महापालिकेच्या शाळांसह खाजगी शाळांमध्ये देखील मोदींचे भाषण पाहण्याची विशेष सोय करण्यात आली. गणोशोत्सवाच्या सुट्टीनंतर शुक्रवारी शाळेचा पहिलाच दिवस होता. त्यामुळे मोदींचे भाषण पाहण्याकरिता शाळेत अधिकाधिक विद्याथ्र्याची हजेरी लागावी यासाठी सर्वच शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रय} करावे लागले. महापालिकेच्या शाळांमध्ये टीव्हीची सोय केली होती. यावेळी शिक्षकांनीही उपस्थित राहून पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा आस्वाद घेतला. प्रथमच पंतप्रधानांनी अशा प्रकारे संपर्क साधला आहे. (प्रतिनिधी)
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार ऐकून खूप बरे वाटले. यंदा प्रथमच शिक्षकदिनी चांगल्या विचाराचे भाषण ऐकायला मिळाले. मोदींचे हे भाषण ऐकल्यानंतर आम्हालाही त्यांच्याप्रमाणो मोठे होण्याची इच्छा निर्माण झाली आहे. 
- महेक सय्यद, विद्यार्थिनी, मनपा 
शाळा क्र.19, इयत्ता 8वी.
आपल्या भाषणातून मोदींनी दिलेले संदेश ख:या अर्थाने उपयुक्त होते. आईनंतरचे दुसरे गुरु असलेल्या शिक्षकांना सन्मानाची वागणूक द्या हा मोदींचा सल्ला देखील योग्य होता. तर आपल्या अमूल्य वेळेतून त्यांनी विद्याथ्र्यांसाठी वेळ काढला ही कौतुकाची बाब आहे.
- लीला बिस्ट, विद्यार्थिनी मनपा 
शाळा क्र 18, इयत्ता 8 वी. 
 
भाषणात तांत्रिक अडचणी
4पंतप्रधानांचे भाषण विद्याथ्र्याना पहाता यावे याकरिता शाळांमध्ये विशेष सोय करण्यात आली होती. काही ठिकाणी इंटरनेटद्वारे हे भाषण दाखवले जात असताना इंटरनेट बंद पडत होते. सुरु असलेल्या भाषणात सातत्याने हे आधुनिक विघ्न येत होते. त्यामुळे मोठय़ा उत्साहात मोदींच्या भाषणासाठी जमलेल्या विद्याथ्र्याचा हिरमोड झाला. सर्वच वृत्तवाहिन्यांच्या संकेतस्थळांवर या भाषणाचे थेट प्रक्षेपण दाखवले जात होते. परंतु या संकेतस्थळांचा वापर वाढल्याने हा अडथळा निर्माण झाला.