Join us  

पंतप्रधान आज मुंबईत, गुंतवणूक परिषद, नवी मुंबई विमानतळ पायाभरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 6:37 AM

तब्बल १० लाख कोटी गुंतवणुकीचे लक्ष्य असलेली मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स ही गुंतवणूकदार परिषद रविवारपासून सुरू होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सायंकाळी वांद्रे-कुर्ला संकुलात तिचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जगातील नामवंत कंपन्यांचे सीईओ या वेळी प्रामुख्याने उपस्थित असतील.

मुंबई : तब्बल १० लाख कोटी गुंतवणुकीचे लक्ष्य असलेली मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स ही गुंतवणूकदार परिषद रविवारपासून सुरू होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सायंकाळी वांद्रे-कुर्ला संकुलात तिचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जगातील नामवंत कंपन्यांचे सीईओ या वेळी प्रामुख्याने उपस्थित असतील. त्या आधी नवी मुंबई विमानतळाचा पायाभरणी समारंभही मोदी यांच्या हस्ते होणार आहे.या परिषदेत ४५०० सामंजस्य करार होतील व त्यातून ३५ लाखांना रोजगार मिळेल, असा राज्य सरकारचा दावा आहे. जगातील १५0 कंपन्यांचे सीईओ त्यात सहभागी होणार आहेत. व्हर्जिन हायपरपूलचे रिचर्ड ब्रॅन्सन, इमर्सनचे एडवर्ड मोन्सन, मुकेश अंबानी, आंनद महिंद्रा यांचा त्यात समावेश असेल.काही देशांचे उद्योगमंत्री, संरक्षण उत्पादन कंपन्यांचे सीईओही यात सहभागी होतील. उद्घाटनानंतर जगातील निवडक सीईओंबरोबर पंतप्रधान मोदी हे बंदद्वार चर्चा करणार आहेत. २ दिवसांत ई-व्हेइकलसारखे नवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट आॅफ थिंग्स, इन्फ्रास्ट्रक्चर, स्मार्ट सिटी, निर्यात, सप्लाय चेन रचना, जल नियोजन,उद्योजिका, इज आॅफ डुइंग बिझनेस, मेक इन महाराष्ट्र आदी विषयांवरील चर्चासत्रे आहेत. सोमवार, १९ रोजी दुपारी मुख्यमंत्री महाराष्ट्राला वन ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे नेण्याबाबतचे व्हिजन मांडतील.

टॅग्स :नरेंद्र मोदीमुंबई