Join us  

प्लॅस्टिक बंदीचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचलला; आदित्य ठाकरेंकडून आभार व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 6:42 PM

प्लास्टिक बंदीची विनंती करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी ही पत्रकार परिषद घेतली.

मुंबई : प्लॅस्टिक बंदीचा मुद्दा शिवसेनेने मांडला होता. आता लालकिल्ल्यावर स्वातंत्र्यदिनीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा मुद्दा देशासमोर ठेवला आहे. महाराष्ट्रात जी प्लास्टिक बंदी लागू झाली त्यामुळे कचऱ्याच्या प्रमाणात देखील फरक दिसू लागलेला आहे. भारतामध्ये आणि जगामध्ये सर्वच ठिकाणी प्लास्टिक बंद होण्यासाठी थोडासा वेळ लागेल, असे सांगत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मोदींचे आभार मानले. 

प्रत्येक नागरिकाला प्लास्टिक बंदीची विनंती करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी ही पत्रकार परिषद घेतली. पूर्णपणे प्लास्टिक बंदी जर केली तर त्याचा पर्यावरणावर खूप चांगला परिणाम दिसून येईल. यासाठी लवकरात लवकर कायदा येणे सुद्धा गरजेचे आहे. भारतातील २० राज्यांमध्ये प्लास्टिक बंदी लागू झालेली आहे. यामुळे महिलांना रोजगारही मोठ्याप्रमाणावर उपलब्ध झाला आहे, असे ठाकरे म्हणाले. 

रेल्वे स्थानक आणि विमानतळ प्लास्टिकमुक्त करण्याबाबत मी हरदीप सिंग यांना भेटलो होतो. प्लास्टिकला पर्याय म्हणून बऱ्याच गोष्टी बाजारात उपलब्ध आहेत. मानसिकता बदलणे गरजेचे आहे आणि मानसिकता बदलण्यासाठी जागरुकता करणे गरजेचे आहे. यासाठी देखील प्रयत्न चालू आहेत. प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई सुरू असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. 

टॅग्स :आदित्य ठाकरेप्लॅस्टिक बंदी