मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या प्रचाराचा प्रारंभ महालक्ष्मी रेसकोर्सवरून केला. आता त्याला जबाब देण्याकरिता भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे उद्या, शनिवार 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आयोजन केले आहे.
मोदी यांच्या सभांना महाराष्ट्रात प्रारंभ होत आहे. शनिवारी दुपारी 2 वाजता बीड येथील अटलजी मैदानात मोदींची सभा होईल. त्यानंतर 4 वाजता औरंगाबाद सिडको येथील गरवारे स्टेडियम येथे त्यांची सभा होईल. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता महालक्ष्मी रेसकोर्सवर सभा आयोजित केली आहे.
रविवारी दुपारी दीड वाजता कोल्हापूरच्या तपोवन ग्राउंड येथे मोदींची सभा होईल. सायंकाळी साडेचार वाजता गोंदिया येथील इंदिरा गांधी स्टेडियमवरील सभेत मोदी मार्गदर्शन करतील. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता नाशिकमध्ये तपोवन, पंचवटी येथे मोदींची सभा होईल. (विशेष प्रतिनिधी)