Join us  

सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या नेत्यांच्या कर्तृत्वाचा झाला गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 1:54 AM

‘लोकमत पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ मुंबई’चे प्रकाशन

मुंबई : सामाजिक कार्याचा वसा घेऊन राजकीय क्षेत्रात उतरलेल्या नेत्यांचा प्रवास सोपा नसतो. पुढारी म्हटले की त्यांच्यावर टीका होतेच. परंतु त्यांच्या यशोगाथेमागे त्यांचा अविरत संघर्ष असतो. मोठमोठी पदे भूषवितानाच त्यांनी केलेली लोकोपयोगी कामे, त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान ‘लोकमत पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ मुंबई’ या दिमाखदार सोहळ्यात सोमवारी करण्यात आला. याप्रसंगी मुंबईतील राजकीय व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणाऱ्या ‘कॉफी टेबल बुक’चेही प्रकाशन करण्यात आले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे रंगलेल्या या सोहळ्यात मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई, पालघर येथील राजकीय नेतृत्वांना ‘लोकमत पॉलिटिकल आयकॉन्स आॅफ मुंबई’ या किताबाने गौरविण्यात आले. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री आशिष शेलार, वनाधिपती, माजी आमदार विनायकदादा पाटील, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलित करीत कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.

मुंबई महानगरातील ३० आयकॉन्सचा गौरव प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. प्रत्येक आयकॉनचा राजकीय प्रवास, संघर्ष व कार्याची माहिती देत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. या वेळी प्रेक्षकही प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात या आयकॉन्सचे कौतुक करीत होते. ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, सल्लागार संपादक दिनकर रायकर, मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, साहाय्यक उपाध्यक्ष विजय शुक्ला यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.

लोकमत समूहामार्फत दरवर्षी १६०० सामाजिक उपक्रम व कार्यक्रम आयोजित केले जातात. वृत्तपत्रांतून टीका-टिपणी करतानाच समाजात चांगले कार्य करणाºया लोकांची दखलही ‘लोकमत’ घेत असते. अशा पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून ‘लोकमत’मार्फत त्यांच्या कर्र्तृत्वाला सलाम करण्यात येतो, असे विनायक पात्रुडकर यांनी प्रास्ताविकेतून सांगितले.

मुंबईत सोमवारी कोसळलेल्या मुसळधार पावसातही राजकीय क्षेत्रातील मान्यवर नेते व प्रेक्षक मोठ्या संख्येने पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित होते. या दिमाखदार सोहळ्याचे नेटके सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केले. ‘नुपूर स्कूल ऑफ डान्स अकादमी’च्या विद्यार्थिनींनी आपल्या नृत्याविष्काराने प्रेक्षकांची दाद मिळवली.व्यासपीठावर रंगला नेत्यांचा प्रश्नोत्तरांचा तासपुरस्कार वितरण सुरू असताना वरिष्ठ साहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी आणि वरिष्ठ साहाय्यक संपादक संदीप प्रधान यांनी व्यासपीठावर उपस्थित मंत्रिमहोदय व ज्येष्ठ नेत्यांचाच प्रश्नोत्तरांचा तास घेत कार्यक्रमात रंगत आणली. काही प्रश्न अडचणीत आणणारे असतानाही पाहुण्यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिल्याने प्रेक्षकांकडूनही त्यास दाद मिळत होती.

टॅग्स :लोकमत