पूनम धुमाळ. गोरेगाव - माणगाव तालुक्यातील नवीन प्रशासकीय भवनातील सभागृहात शुक्रवारी नैसिर्गक आपत्ती व्यवस्थापन विषयावर चर्चा करणेबाबत सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी माणगाव विभाग उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव- दिघावकर व माणगाव तहसीलदार महेश सागर हे होते. यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा संपन्न झाली. माणगाव तालुक्यात तालुका आपत्ती प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात आली आहे. तालुक्यातील आपत्ती प्रवण क्षेत्राची माहिती व तालुक्यातील सर्व कार्यालयांची माहिती घेऊन आपत्ती कृती आराखडा करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार महेश सागर यांनी दिली. उपविभागीय अधिकारी यांच्या संकल्पनेनुसार तहसीलदार यांनी एक छोटी पुस्तिका तयार केली आहे, त्याद्वारे गावातील प्रत्येक कार्यालय, सरपंच, लोकप्रतिनिधी यांना आपत्ती व्यवस्थापन आराखडा सुलभरीत्या उपलब्ध होणार आहे. गुरुवारी मौजे कळमजे येथे नैसर्गिक आपत्तीचे मॉकड्रील घेण्यात आले.तालुका तहसील मध्ये चोवीस तास नियंत्रण कक्ष असेल. त्यासाठी निवासी नायब तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सभेस सभापती संगीता बक्कम, उपसभापती शुभांगी साबळे, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रतिनिधी पाठक, आपत्ती व्यवस्थापन संस्था चालक मुळीक तसेच इतर लोकप्रतिनिधी सरपंच, तलाठी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापनासाठी माणगाव सज्ज
By admin | Updated: June 2, 2014 04:40 IST