Join us
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यापूर्वीची आदिवासींची तयारी

By admin | Updated: May 31, 2015 22:56 IST

तालुका ९९ टक्के आदिवासी तालुका आहे. तालुक्यात दीड लाख लोकसंख्या आहे. यात खेड्यापाड्यांतील बहुतांश घरे कुडाची-विटामातीची असल्यामुळे

जव्हार : तालुका ९९ टक्के आदिवासी तालुका आहे. तालुक्यात दीड लाख लोकसंख्या आहे. यात खेड्यापाड्यांतील बहुतांश घरे कुडाची-विटामातीची असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही घरांवर टाकण्यासाठी, गायगोठ्यासाठी, पावसाळ्यात चुलीसाठी लागणाऱ्या लाकडांसाठी प्लास्टिक किंवा ताडपत्री खरेदी करण्यासाठी जव्हारमध्ये सध्या जोरदार गर्दी आहे. आता लवकरच पाऊस येणार अशी चाहूल लागल्याने जव्हार बाजारपेठेत घरांवरील कौलांवर अंथरण्यासाठी, कु डाच्या घरांवर तसेच गायगोठ्यांच्या अवतीभवती बांधण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कापड लागणार असून ते जव्हारच्या बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे. परिसरातील आदिवासी बांधव पावसाळ्यात घरात पाण्याची गळती होऊ नये म्हणून खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिकची खरेदी करीत असतात. प्लास्टिकमध्ये काळे प्लास्टिक हे सर्वात स्वस्त म्हणजे रुपये ५० ते ५५ प्रति किलो आहे. याचा पन्हा (रुंदी) १२ ते १५ फु टांचा असतो. निळ्या, पिवळ्या किंवा सफेद कलरचेदेखील प्लास्टिक बाजारपेठेत मिळते. तसेच प्लास्टिकच्या घोंगड्यांचेही चलन येथे मोठ्या प्रमाणात आहे. घोंगड्यांचा उपयोग भर पावसात शेतात लावणी करताना होत असतो. शिवाय, निळ्या रंगाच्या प्लास्टिक ताडपत्र्या मोठ्या प्रमाणात खरेदी के ल्या जातात. निळी ताडपत्री जाड असल्यामुळे टिकाऊ असते. याचा ४ फु टी, ६ फु टी, ८ फुटी, १२ फु टी पन्हा असतो. ताडपत्र्या मीटरमध्ये विकल्या जातात. जव्हार ही प्लास्टिक कापडाच्या आणि छत्र्यांच्या बाबतीत मोठी बाजारपेठ असून येथे पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे फेब्रुवारी-मार्चपासून मोठे व्यापारी लाखो टन प्लास्टिक कापडाची खरेदी करून साठा करून ठेवतात व त्यांची सिझनला विक्री होत असते. (वार्ताहर)