Join us  

निवडणूक यंत्रणेची तयारी पूर्ण; पारदर्शी व अचूकतेने मतमोजणी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 9:22 PM

जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली माहिती 

ठळक मुद्देमतमोजणी ठीक सकाळी ८ वाजता सुरू केली जाणार आहे. मतमोजणीच्या कामासाठी जवळपास ३ हजार कर्मचारी/अधिकारी नेमण्यात आले

मुंबईमुंबई शहर जिल्हयातील ३०-मुंबई दक्षिण मध्य व ३१-मुंबई दक्षिण या दोन्ही लोकसभा मतदार संघाची मतमोजणी २३ मे रोजी शिवडी येथील न्यू शिवडी वेअर हाऊस, गाडी अड्डाजवळ, सी.एफ.एस. एरीया, एम.एस.रोड, मुंबई पोर्ट ट्रस्ट, शिवडी (पूर्व), मुंबई-४०० ०१५ येथे होणार असून निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी सुसज्ज आहे. मतमोजणीच्या कामासाठी जवळपास ३ हजार कर्मचारी/अधिकारी नेमण्यात आले असून त्यांच्यामार्फत अत्यंत पारदर्शीपणाने, काळजीपूर्वक व अचूकतेने मतमोजणी पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी व्यक्त केला.मत मोजणीसाठी १४ टेबल्समुंबई जिल्हयातील दोन्हीही लोकसभा मतदारसंघातील एकुण १२ विधानसभा मतदार संघ निहाय होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रत्येकी विधानसभा निहाय १४ टेबल असणार आहेत. त्यानुसार लोकसभा मतदार संघाच्या फेऱ्या होणार आहेत. ३०-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघासाठी अणुशक्तीनगर, चेंबूर, धारावी, कोळीवाडा, वडाळा, माहिम व ३१-मुंबई दक्षिण वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा असे एकुण बारा विधानसभा मतदारसंघ येतात. यात अनुक्रमे ३०-मुंबई दक्षिण मध्य मध्ये पुरुष-४,३२,२६०, स्त्री-३,६३,१०७ व इतर ३२ असे एकुण ७,९५,३९९ म्हणजेच ५५.२३% मतदान झाले. तर ३१-मुंबई दक्षिण मध्ये पुरुष-४,३८,५९१, स्त्री-३,६१,०१६ व इतर ०५ असे एकुण ७,९९,६१२ एकुण ५१.४५ % मतदान झाले.३०-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात एकुण मतदार संख्या पुरुष ७,७७,७१६, स्त्री ६,६२,३३५ व इतर ९१ एकुण १४,४०,११०

विधानसभा मतदार संघ मतदान केंद्र संख्या आणि होणाऱ्या मतमोजणी फेऱ्या झालेले ऐकूण मतदान (स्त्री, पुरुष व इतर) अणुशक्तीनगर २५०, १८ १,३८,७५२ चेंबूर २८५, २१ १,४३,२०६ धारावी २८३, २१ १,१८,८९८ कोळीवाडा २६७, २० १,३७,११५ वडाळा २२४, १६ १,२१,१८९ माहिम २४९, १८ १,३६,२३९मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार संख्या पुरुष ८,५४,१२१, स्त्री ६,९९,७८१ व इतर २३ एकूण १५,५३,९२५विधानसभा मतदार संघ मतदान केंद्र संख्या आणि होणाऱ्या मतमोजणी फेऱ्या झालेले एकूण मतदान (स्त्री, पुरुष व इतर) वरळी २४३, १८ १,३९,१०५ शिवडी २५९, १९ १,४४,४२० भायखळा २५५, १९ १,३२,८५७ मलबार हिल २७७, २० १,४६,२०० मुंबादेवी २४९, १८ १,१७,२५६ कुलाबा २९५, २२ १,१९,७७४अशी होईल मतमोजणीमतमोजणी ठीक सकाळी ८ वाजता सुरू केली जाणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी १४ टेबल निहाय आराखडा तयार करण्यात आलेला आहे. सर्व विधानसभा मतदार संघातील ८४ टेबलनिहाय पहिल्या फेरीची मतमोजणी झाल्यानंतर, दुसरी फेरीची मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे.सर्व प्रथम ईटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम) मते बारकोडद्वारे मोजली जाणार आहेत. तसेच पोस्टल बॅलेटद्वारे प्राप्त झालेली मते मोजली जाणार आहेत. ३०-मुंबई दक्षिण मध्य मतदार लोकसभा मतदारसंघात ईटीपीबीएसचे एकुण २३८ मतदार व पोस्टल बॅलेटचे एकुण ३५३७ असे एकुण ३७७५ मतदार आहेत. तसेच ३१-मुंबई दक्षिण मतदार लोकसभा मतदारसंघात ईटीपीबीएसचे एकुण २५१ मतदार व पोस्टल बॅलेटचे एकुण ३१३३ असे एकुण ३३८४ मतदार आहेत. त्या मतपत्रिकांची मतमोजणी प्रथम केली जाणार आहे. 

मर्यादित प्रवेश शिवडी येथे कडक पोलीस बंदोबस्त असून मतमोजणीच्या दिवशी देखील अधिकृत प्राधिकार पत्र किंवा निवडणूक ओळखपत्र असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी, पर्यवेक्षक, मतमोजणी कर्मचारी या सर्वांना आयोगाच्या तसेच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या यांच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करावयाचे आहे प्रशिक्षणमतमोजणीसाठी आवश्यक अधिकारी/ कर्मचारी यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. सदर मतमोजणी अधिकारी/ कर्मचारी यांचे मंगळवार, १४ मे २०१९ रोजी पहिले प्रशिक्षण, शुक्रवार १७ मे २०१९ रोजी दुसरे प्रशिक्षण झाले.  तसेच मतमोजणीची रंगीत तालीम मंगळवार, दिनांक २१ मे २०१९ रोजी शिवडी मतमोजणी केंद्र येथे घेण्यात येणार आहे. सर्व मतदारसंघाची टेबल व फेरी निहाय मतमोजणी, nतसेच पोस्टल बॅलेट व ईटीपीबीएस यांची मतमोजणी झाल्यानंतर निकाल घोषित केला जाईल. 39 मुंबई दक्षिण-मध्य चे निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी पवार, 31 मुंबई दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी तसेच उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी फरोग मुकादम या सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. त्याचप्रमाणे पोलीस विभागाच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर व त्यांचे सहकारी सुरक्षेबाबत कार्यरत आहेत. 

टॅग्स :लोकसभा निवडणूक निकाललोकसभा निवडणूक २०१९जिल्हाधिकारीमुंबई