Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या

By admin | Updated: November 3, 2014 00:28 IST

शुक्रवारी दुपारी १२ वा. च्या सुमारास ओसार पलाटपाडा येथे वादग्रस्त जमिनीवर मयत मयुर चौधरी याने घर बांधण्यास घेतले आहे

डहाणू : डहाणू तालुक्यातील वाणगाव जवळच्या ओसार पलाटपाडा येथे जमिनीच्या वादाच्या पुर्ववैमनस्यातुन शुक्रवारी मयूर रवि चौधरी (२०) याची एका तथाकथित संघटनेचे कार्यकर्ते म्हणविणाऱ्या १५-२० जणांनी त्यांच्या घराच्या फाटकाजवळ लोखंडी पहार, कोयता आणि कुदळीने वार करून निर्घूण हत्या केली. याचा वाणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ७ जणांना अटक करण्यात आले आहे.शुक्रवारी दुपारी १२ वा. च्या सुमारास ओसार पलाटपाडा येथे वादग्रस्त जमिनीवर मयत मयुर चौधरी याने घर बांधण्यास घेतले आहे. त्या घराच्या फाटकाजवळ मयुर चौधरी लोखंडी पहार, ने १५-२० जणांनी हल्ला केला. मानेवर कोयत्याने धाव घालुन लोखंडी पहार छातीत खुपसून त्याची निर्घूण हत्या केली. त्याचा मृतदेह डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असताना त्याचा मृतदेह स्विकारण्यास त्याच्या कुटूंबीानी नकार दिला. अखेर पालघर जिल्हा अतिरिक्त पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत शिवथरे यांच्या आरोपींना अटक करण्याच्या आश्वासनानंतर आज सकाळी मृत मयूर चौधरीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचबरोबर हत्येत सामिल असलेल्या परशुराम तांडेल, जगदीश तांडेल, निलेश तांडेल, मनोज तांडेल, मिना तांडेल, पार्वती तांडेल रा. सर्व आसनगाव आणि मनोज पाटील रा. चिंचणी यांना अटक करण्यात येवून इतर १४ जण फरार आहेत.