Join us  

‘त्या’ गर्भवती महिलेचा मृत्यू कामा रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2021 6:20 AM

माता मृत्यू अन्वेषण समितीचे ताशेरे; उपचाराच्या नियमांचे पालन केल्याचा ठपका

ठळक मुद्देमाता मृत्यू अन्वेषण समितीचे ताशेरे; उपचाराच्या नियमांचे पालन केल्याचा ठपका

मुंबई : कोविड आजाराने स्नेहा अशोक मोकाशे या २८ वर्षीय महिलेचा  १७ मे २०२१ रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. जिल्हास्तरीय “माता मृत्यू अन्वेषण समितीकडून या प्रकरणासंदर्भात  अहवाल तयार करण्यात आला आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार कामा रुग्णालयात ही केस गेली असता, उपचारादरम्यान कामा रुग्णालयाकडून हलगर्जी झाल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी समितीच्या अहवालानुसार दिसते आहे.

या महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर प्रकृती गंभीर होत असतानाही, तसेच रुग्णालयात तज्ज्ञ उपस्थित नसतानाही, या महिलेवर कामामध्ये उपचार सुरू ठेवण्यात आले. या मृत्यूनंतर ८ जून रोजी समितीची बैठक झाली होती. त्यानुसार कामा रुग्णालयात ही महिला २८ एप्रिलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाली, तर १७ मे रोजी महिलेचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले की, या प्रकरणाची माहिती नाही, संबंधित विभागांशी बोलून माहिती घेतो.

अहवालातील निरीक्षण

  • कोविडची सौम्य लक्षणे असताना महिला कामा रुग्णालयामध्ये दाखल झाली, तेव्हा तिला उपयुक्त प्राणवायू पुरवठा करण्यात आला.
  • फ्लेगझोन इंजेक्शन (रक्त पातळ करण्याचे इंजेक्शन) डी डायमर चाचणी केल्यानंतर दिले जाते.  चाचणी न करता हे इंजेक्शन या महिलेला देण्यात आले.
  • रुग्ण ९ महिन्यांची गरोदर होती. अशा रुग्णाला श्वासनास त्रास होत असेल तर प्रसूती करून उपचार वेळेत सुरू करणे गरजेचे होते; पण रुग्ण अत्यवस्थ होऊनही प्रसूती वेळेत केली गेली नाही, त्यामुळे महिलेला श्वासनास आणखी त्रास वाढला, असा ठपका ठेवण्यात आला आहे.
  • कामा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होऊनही ५ दिवस या महिलेला तज्ज्ञांच्या उपचारांपासून दूर ठेवण्यात आले. त्यामुळे योग्य उपचार न मिळून ही महिला अत्यवस्थ होत गेली
  • नियमित तपासणी झाली नाही, असे समितीच्या निदर्शनास आले अत्यवस्थ झाल्यानंतर सेंट जॉर्ज रुग्णालयात रुग्णाला हलवण्यात आले. त्यानंतर महिलेचा मृत्यू झाला आहे.

 ही कोरोना नियमावली पाळणे गरजेचे 

कोविड मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार व्हायला हवे होते; पण रुग्णालयाकडून झाले नाहीत.नऊ महिने उलटून गेल्यामुळे महिलेची प्रसूती वेळेत होणे अत्यंत गरजेचे होते. जेणेकरून महिलेला श्वासोच्छवासासाठी त्रास झाला नसता, पुढचे उपचार सोपे होऊन जीव वाचला असता.

माता मृत्यू कमी करण्यासाठी कोविड रुग्णांना विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन उपचार देणे गरजेचे होते; पण तशी कोणतीही व्यवस्था न करता रुग्णालयाने  स्वतःचा उपचार देण्यास सुरुवात केली 

औषध वैद्यकशास्त्राकडूनच पहिल्या दिवसापासून कोविड रुग्णाला हाताळले पाहिजे होते.

टॅग्स :हॉस्पिटलगर्भवती महिलाकोरोना वायरस बातम्या