मुंबई : मुंबई हे देशातील अत्यंत महत्त्वाचे महानगर असल्याने या ठिकाणची कायदा व सुव्यवस्था कायम राहणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे येथील महिला व बालकांच्या सुरक्षेला आपण प्राधान्य देणार असल्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी सांगितले. आठवड्याभरावर आलेला गणेशोत्सव, बकरी ईद सुरळीतपणे पार पाडण्यासाठी बंदोबस्ताचे विशेष नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सोमवारी दुपारी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, पोलिसांचे विविध प्रश्न, अडचणी सरळ व पारदर्शकपणे सोडविण्यात आल्या पाहिजेत. त्यात इतरांनी दखल देण्याची आवश्यकता नाही, असे आपले मत आहे. पोलिसांचे कोणतेही काम केवळ एकाच्या जिवावर होत नाही, त्यासाठी ‘टीम वर्क’ हवे असते, त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्यावर आपला भर राहणार आहे. येत्या काही दिवसांत गणेशोत्सव व ईद येत असून, ती मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. हे उत्सव सुरळीतपणे पार पडावेत यासाठी विशेष बंदोबस्ताचे नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तीन बाबींना प्राधान्य : ‘शहरातील कायदा व सुव्यवस्था, महिला व बालकांची सुरक्षा आणि सर्वसामान्य नागरिकाला पोलीस ठाण्यात सन्मानजनक वागणूक मिळणे, या तीन बाबींवर आपले प्राधान्य राहणार आहे
महिला-मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य
By admin | Updated: September 9, 2015 01:32 IST