Join us
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदान मोहिमेला प्राधान्य द्या - महापौर

By admin | Updated: August 28, 2015 23:43 IST

देशभर रक्तदानाची मोहीम प्रभावीपणे राबविली जाते. मुंबईत ६२ रक्तपेढ्या असून रक्तदानाच्या बाबतीत राज्यात मुंबई आघाडीवर आहे. अशाच प्रकारे अवयवदानाची मोहीम राबविण्यात यावी

मुंबई : देशभर रक्तदानाची मोहीम प्रभावीपणे राबविली जाते. मुंबईत ६२ रक्तपेढ्या असून रक्तदानाच्या बाबतीत राज्यात मुंबई आघाडीवर आहे. अशाच प्रकारे अवयवदानाची मोहीम राबविण्यात यावी, असे आवाहन महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले.नायर रुग्णालयात आयोजित रक्तदान शिबिराच्या आयोजकांच्या सन्मान सोहळ्यादरम्यान त्या बोलत होत्या. ‘रक्तदानासारखे पवित्र दान नाही. आज आपल्या हातून सुमारे १०१ रक्तदान मोहिमा आयोजित करणाऱ्या आयोजकांचा गौरव होत आहे, याचा मला अभिमान वाटतो. नि:स्वार्थ भूमिकेतून आपली ही सेवा अखंड घडो,’ असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)