Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व प्राथमिकचे प्रवेश टांगणीला

By admin | Updated: July 7, 2015 23:56 IST

सरकारच्या चुकीच्या भूमिकेमुळे यंदा पूर्व प्राथमिक वर्गांचे प्रवेश टांगणीला लागले आहेत, असे खडेबोल उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य शासनाला सुनावले.

मुंबई : सरकारच्या चुकीच्या भूमिकेमुळे यंदा पूर्व प्राथमिक वर्गांचे प्रवेश टांगणीला लागले आहेत, असे खडेबोल उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य शासनाला सुनावले.या प्रकरणाबाबतच्या सुनावणीत सरकारने हे प्रवेश थांबवले असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालय संतप्त झाले. आता प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षीच प्रवेश घ्यावा लागणार का, असा सवाल न्यायालयाने केला. त्याचप्रमाणे शिक्षण हक्क कायद्यानुसार मोफत व सक्तीचे शिक्षण कधीपासून आहे हे सरकारने स्पष्ट केलेले नाही, असेही न्यायलयाने नमूद केले. तसेच या कायद्यानुसार प्रवेश न देणाऱ्या शाळांवर नेमकी काय कारवाई केली? याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे दिले. (प्रतिनिधी)