Join us

प्रविणा ठाकूर महापौरपदी?

By admin | Updated: June 18, 2015 00:43 IST

वसई-विरार शहर महानगरपालिकेचे महापौरपद इतर मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षित आहे. या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेचे महापौरपद इतर मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षित आहे. या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या प्रविणा हितेंद्र ठाकूर यांची या पदावर निवड होण्याची शक्यता आहे.विविध सामाजिक संस्थांशी निकटचा संबंध असणाऱ्या प्रविणा ठाकूर या उत्तम वक्त्या म्हणून ओळखल्या जातात. विविध विषयावर त्यांनी केलेली भाषणे राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरली आहेत.प्रविणा ठाकूर या बहुजन विकास आघाडीच्या महिला विभागाच्या अध्यक्षा असून यंदा त्यांना प्रभाग क्र. ९८ मधून उमेदवारी देण्यात आली होती. या प्रभागात त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विरोधीपक्षाच्या महिला उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे त्या बिनविरोध निवडून आल्या. (प्रतिनिधी)