Join us

प्रत्युषा आत्महत्या :राहुलचा जामीन फेटाळला

By admin | Updated: April 8, 2016 02:23 IST

प्रत्युषा बॅनर्जी हिचा प्रियकर राहुल राज सिंग याचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे त्याला आता कधीही अटक होऊ शकते असे बांगुर नगर पोलिसांकडून सांगण्यात आले.

मुंबई: प्रत्युषा बॅनर्जी हिचा प्रियकर राहुल राज सिंग याचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे त्याला आता कधीही अटक होऊ शकते असे बांगुर नगर पोलिसांकडून सांगण्यात आले. गुरुवारी दिंडोशी सत्र न्यायालयात राहुलच्या जामीन अर्जावर सुनावणी होती. यावेळी सरकारी वकील दत्ता मुदिगंटी यांनी, प्रत्युषाच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्याचे न्यायालयाला सांगितले. सहाय्यक वकील फाल्गुनी ब्रह्मभट म्हणाल्या की, प्रत्युषाच्या मृत्यूचा तपास प्राथमिक स्तरावर असून पुढील तपासात ही हत्या असल्याचे उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चौकशीसाठी राहुल उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यानुसार न्यायालयाने राहुलचा जमीन अर्ज फेटाळला. (प्रतिनिधी)