Join us

प्रताप सरनाईकही चौकशीला गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:18 IST

टॉप्स ग्रुप आर्थिक ग़ैरव्यवहार प्रकरणप्रताप सरनाईक चौकशीला गैरहजरटॉप्स ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरण : विहंगचीही गैरहजेरी कायमलोकमत ...

टॉप्स ग्रुप आर्थिक ग़ैरव्यवहार प्रकरण

प्रताप सरनाईक चौकशीला गैरहजर

टॉप्स ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरण : विहंगचीही गैरहजेरी कायम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावून गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले हाेते. मात्र ते गैरहजर राहिले. त्यांचा मुलगा विहंग सरनाईक याचीही गैरहजेरी कायम होती.

एमएमआरडीएच्या सुरक्षारक्षक घोटाळ्याप्रकरणी टॉप्स ग्रुप आणि विहंग ग्रुप यांच्यातील आर्थिक व्यवहाराच्या तपासणीसाठी ईडीकडून विहंग सरनाईक यांना ४ ते ५ वेळा समन्स बजाविण्यात आले. मात्र ते चौकशीला हजर राहिले नाहीत. गुरुवारीही त्यांची गैरहजेरी कायम होती. तर आमदार प्रताप सरनाईक यांनी ते विलगीकरणात असल्याने पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांचा विलगीकरणाचा कालावधी संपल्याने त्यांनाही पुन्हा समन्स बजावत गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र ते हजर झाले नाहीत.

...................................