Join us

प्रशांत ठाकूर यांचा काँग्रेसला रामराम निश्चित?

By admin | Updated: September 17, 2014 02:42 IST

काँग्रेसश्रेष्ठींवर थेट तोफ डागल्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर काँग्रेसला रामराम ठोकणार हे जवळपास निश्चत झाले आहे.

पनवेल : मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाविरोधात पनवेल आणि उरणमधील कार्यकत्र्यामध्ये निर्माण झालेले नाराजी, त्याचबरोबर नेत्यांनी काँग्रेसश्रेष्ठींवर थेट तोफ डागल्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर काँग्रेसला रामराम ठोकणार हे जवळपास निश्चत झाले आहे. मात्र त्यांची पुढची दिशा काय असेल, याबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली आहे. यासंदर्भात बुधवारी निर्णय अपेक्षित असून, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
प्रशांत ठाकूर यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह नुकत्याच झालेल्या मेळाव्यात कार्यकत्र्यानी धरला आहे. त्याचबरोबर काही पदाधिका:यांनी तर चक्क उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. सत्ताधारी आमदार असतानाही पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून कशी वागणूक मिळते याचा पाढाच वाचण्यात येत आहे. आमदारांना दिवस दिवस बाहेर बसून ठेवले जाते, अशी खंत ठाकूर यांनी बोलून दाखवल्याने मुख्यमंत्र्यांविरोधात संतापाची भावना आहे.  
 माजी खासदार रामशेठ ठाकूर यांची प्रतिमा स्वच्छ चारित्र्याचे समाजकारणी अशी असल्याने त्यांचे सर्व पक्षांतील नेत्यांशी चांगले संबंध आहेत. शरद पवार यांच्याशी जवळचे संबंध असल्याने कदाचित राष्ट्रवादीचाही विचार होऊ शकतो. मात्र महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्या विरोधी वातावरण असल्याने घडय़ाळाला पसंती मिळेल असे वाटत नाही. शिवसेनेच्या एका खासदाराकडून शिवबंधन बांधण्याचे निमंत्रण थेट मातोo्रीवरून आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रंनी दिली असली, तरी यावर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. याशिवाय भाजपाचा चांगला पर्याय प्रशांत ठाकूर यांच्यासमोर आहे. या भागात भाजपालाही सक्षम नेतृत्वाची गरज आहे. पनवेलमधून अपक्ष लढण्याचा पर्यायही आहे. याचे कारण म्हणजे ठाकूर यांच्याकडे सर्व यंत्रणा उपलब्ध असून त्यांची मतदारसंघावर पकड आहे. सर्वसामान्यांना टोलचा बोजा पडू नये यासाठी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्याचबरोबर काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला, ही त्यांच्यासाठी जमेची  बाब आहे.
 
काँग्रेसकडून मन वळविण्याचा प्रयत्न
च्विधानसभा निवडणुकीत काँग्रेसपुढे मोठे आव्हान आहे. त्यामुळे निवडून येणारी जागा आणि आमदार पक्षाने गमवला आहे. ठाकूर यांनी काँग्रेसमध्ये राहावे म्हणून काँग्रेस नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. जो काही निर्णय होईल तो आम्हाला बंधनकारक असल्याचे रामशेठ आणि प्रशांत ठाकूर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.