Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसाद कांबळी, महेश कोठारे यांना शिवगौरव पुरस्कार

By admin | Updated: May 24, 2014 00:45 IST

संस्कृती युवा प्रतिष्ठान व विहंग ग्रुप आॅफ कंपनीज यांच्या संयुक्त विद्यमाने शिवगौरव पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे

भार्इंदर : संस्कृती युवा प्रतिष्ठान व विहंग ग्रुप आॅफ कंपनीज यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या शिवगौरव पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम भार्इंदर येथील नवघर पालिका शाळेच्या मैदानावर २४ मे रोजी सायंकाळी ६ वा.च्या सुमारास आयोजित करण्यात आला आहे. ओवळा-माजिवड्याचे आ. प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून ६ वर्षांपासून हे पुरस्कार देण्यात येतात़ यंदाचे पुरस्कार प्रसिद्धिमाध्यमांत आपला ठसा उमटवणारे ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर यांच्यासह विविध वाहिन्या व वृत्तपत्रांच्या १२ नामवंत संपादकांच्या हस्ते १२ मराठी हुरहुन्नरी व्यक्तींना देण्यात येणार आहेत. त्यात प्रसाद मच्छिंद्र कांबळी, वैशाली सदानंद सरवणकर, डॉ. सुहास लेले, निर्मला दादा रासकर, नागराज मंजुळे, श्रीनिवास गोविंदराव म्हेत्रे, रोहन समीर मोरे, वंदना प्रमोद नवलकर, सुप्रिया देशपांडे, मानस दिलीप गाजरे, महेश कोठारे व हिराबाई शिवाजी किरकिरे यांचा समावेश आहे. या वेळी ‘मराठी बाणा’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे़ (प्रतिनिधी)