मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर सुरू झाले असून, आज मनसेचे दादरमधील माजी विभागप्रमुख व माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर यांनी कार्यकर्त्यांसमवेत रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधून घेतले. मनसेमध्ये काम करणाऱ्याला नाही, तर केवळ बडबड करणाऱ्याला संधी दिली जाते, अशी टीका करीत, आगामी निवडणुकीत माहीम विभागातून सेनेचे सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. (प्रतिनिधी)
प्रकाश पाटणकर शिवसेनेत
By admin | Updated: December 26, 2016 04:51 IST